Lockdown Status in India: देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची दुसरी लाट अद्यापही कायम आहे. देशातील कोरोना व्हायरस संक्रमण नियंत्रीत करण्यासाठी देशात कोविड लसीकरण मोहिमीत राबवली जात आहे. त्याची गती म्हणावी तितकी अद्यापही वेगवान नाही. दरम्यान, देशातील विविध राज्यांनी लॉकडाऊन (Lockdown ) जाहीर केला आहे. लॉकडाऊन मुदत संपत आलेल्या काही राज्यांनी निर्बंध शिथील करत पुन्हा एकदा लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. यात महाराष्ट्र, हरियाणा, ओडिशा आदी राज्यांचा समावेश आहे. तर या राज्यांप्रमाणेच दिल्ली, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांनीही काही प्रमाणात निर्बंध शिथील करत लॉकडाऊन शिथील करण्यात सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र, हरियाणा, ओडिशा आणि तेलंगाना ही घटक राज्ये आणि काही काही केंद्र शासित प्रदेशांनी लॉकडाउन (Lockdown) कालावधी वाढवला आहे. यासोबतच उत्तर प्रदेश, जम्मू कश्मीर आदी राज्यांनी कोरोना व्हायरस संक्रमण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील केले आहेत. मात्र, या ठिकाणी रात्रीची संचारबंदी कायम असेल.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढविला आहे. मात्र, यासोबतच राज्य सरकारने हेही जाहीर केले आहे की, राज्यातील कोरोना संक्रमणाचा दर, ऑक्सिजन आणि कोविड सेंटर्समध्ये उपलब्ध असलेल्या बेडची संख्या याचा सारसार विचार करुन संबंधित ठिकाणी निर्बध शिथील केले जातील. याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल. यासोबतच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर 10% पेक्षा कमी आहे आणि ऑक्सिजन बेड हे 40% पेक्षा कमी प्रमाणात भरले आहेत अशा ठिकाणी दुकाने आणि इतर सेवा सुरु ठेवण्याचा कालावधी वाढविण्यात येणार आहे. हा कालावधी सकाळी 7 ते दुपारी 2 असा आहे. मात्र सध्यास्थितीत हा कालावधी सकाळी 7 ते 11 असा आहे. (हेही वाचा, Maharashtra Covid-19 Restrictions: पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यांत आवश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु; जाणून घ्या काय असतील राज्यातील निर्बंध)
उत्तर प्रदेश सरकारने कोविड 19 विषाणूचा वाढता संसर्ग विचारात घेता लॉकडाऊन कायम ठेवला आहे. मात्र सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीसाठी निर्बंध शिथील केले आहेत. या राज्यात शनिवार, रविवार पूरणपणे कडक लॉकडाऊन असणार आहे.
दिल्ली राज्यात आज (31 मे 2021) लॉकडाऊन निर्बंधात काहीशी शिथीलता दिल्याचे पाहायला मिळाले आहे. 31 मे पासून उद्योग आणि नागरी गोष्टींसाठी सशर्थ शिथिलता देण्यात आली आहे. 31 मे पासून दिल्ली हळूहळू अनलॉक होऊ शकेल. परंतू, दिल्लीतील लॉकडाऊन 7 जून पर्यंत वाढवण्यात आला आहे.