कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशभरात लॉक (Lockdown) डाऊन जारी करण्यात आले आहे. येत्या 3 मे पर्यंत लॉक डाऊन कायम असणार आहे. साधारणपणे एप्रिल आणि मे महिना हा लग्नसोहळ्यांचा कालावधी म्हणून ओळखला जातो दरवर्षी या महिन्यांमध्ये अनेकांचे लग्न समारंभ शेड्युल असतात. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे हे सोहळे लांबणीवर पडले आहेत. यातही काहींनी क्लुप्त्या काढून ऑनलाईन म्हणजेच व्हिडीओ कॉल (Video Call) च्या माध्यमातून लग्न उरकून घेतले आहे. ही लग्न पद्धत सोयीची असली तरी हे काही अनिवार्य नाही. मात्र हे न लक्षात घेताच उत्तर प्रदेशातील एका नवऱ्या मुलीच्या कुटुंबाने नवरदेवाच्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली आहे. नवरदेवाने लग्न व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून करण्यासाठी नकार दिल्याने मुलीच्या कुटुंबाने हे पाऊल उचलल्याचे समजत आहे. हरियाणा: Coronavirus Lockdown मध्ये जिल्हा कलेक्टरने रात्री 8 वाजता ऑफिस उघडून लावले रोहतकच्या नवरदेवाचं मॅक्सिकन मुलीशी लग्न !
प्राप्त माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील, बरेली शहरातील करुआ साहाबगंज गावातील कुलाडिया भागात घडला आहे. शामसूल हसन यांची कन्या फर्जाना हिचा इर्शाद हुसेन याच्याशी विवाह ठरला होता. 19 एप्रिल रोजी त्यांचे लग्न बरेली येथे होणार होते. मात्र यावेळी लॉक डाऊन मुळे इर्शाद हा पंजाब मध्ये अडकून पडला आहे. यावेळी हसन यांनी हुसेन याला व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून विवाहाच्या विधी करूयात असे सुचवले. मात्र हुसेन याने याला नकार दिला. परिणामी चिडून हसन यांनी पोलिसात धाव घेत हुसेनच्या विरोधात तक्रार केली. Coronavirus Lockdown मुळे औरंगाबाद येथे मुस्लिम कपलने व्हिडिओ कॉलवरच उरकला 'निकाह' (Watch Video)
दरम्यान, हसन यांनी पोलिसांना सांगितले की, हुसेन याला हुंडा न दिल्याने त्याने लग्नाला नकार दिला मात्र पोलिसांनी चौकशी केली असता हुसेन हा लॉक डाऊन मुळे पंजाब मध्ये अडकून पडला आहे हे स्पष्ट झाले. त्यामुळे हा प्रकार गुन्हा नसून याविरुद्ध टाकणार करण्यासाठी कायद्यात तरतुद नाही असे पोलिसांनी हसन यांना समाजवले. त्यानंतर दोन्ही परिवारांनी एकमताने लागण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी सध्याच्या लग्नाच्या तयारीसाठी झालेल्या खर्चाची भरपाई देतो असे कबूल करावे लागले. दुसरीकडे उत्तर प्रदेशात कोरोनामुळे 3 मे पर्यंत तरी काटेकोर पद्धतीने लॉक डाऊन पाळण्यात येणार आहे.