LIC | File Image

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वाधिक मोठी विमा कंपनी LIC संदर्भातील काही नियमांत बदल होणार आहेत. त्यामुळे नवे नियम उद्या (10 मे) पासून लागू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार एलआयसीची सर्व कार्यालये आठवड्यातील आता फक्त 5 दिवसच सुरु राहणार आहेत. विमा कंपनी शनिवारी आता बंद राहणार आहे. कंपनीने एका सार्वजनिक नोटिसमध्ये असे म्हटले आहे की, 15 एप्रिल 2021 च्या अधिसूचनेत भारत सरकारकडून भारतीय जीवन विमा निगमसाठी प्रत्येक शनिवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.(COVID-19 च्या राष्ट्रीय नीतीमध्ये बदल, आता आरोग्य केंद्रात भरती होण्यासाठी पॉजिटीव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक नाही, जाणून घ्या नवी नियमावली)

एलआयसीकडून एक अधिकृत नोटीस जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नव्या कामकाजांच्या वेळेसंदर्भात सांगण्यात आले आहे. 10 मे पासून एलआयसी ऑफिस आठवड्यातील पाच दिवस म्हणजेच सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. त्यामुळे एलआयसी ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने सुद्धा काही सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी https://licindia.in/ या संकेतस्थळाला ग्राहकांनी भेट द्यावी. या व्यतिरिक्त कोरोना काळात ग्राहकांच्या असुविधा लक्षात घेता एलआयसीकडून काही नियमांत दिलासा देणार असल्याची सुद्धा घोषणा केली आहे.(7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता; Dearness Allowance बाबत लवकरच होणार निर्णय)

तर एलआयसी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुद्धा लवकरच वाढ होणार आहे. अर्थमंत्रालयाच्या आर्थिक सेवा विभागाकडून वेतन संशोधन बिलाला मंजूरी दिली आहे. एक लाखांहून अधिक एलआयसी कर्मचाऱ्यांना वेज रिव्हिजन बिलाचा फायदा होणार आहे. सुत्रांनुसार, वेतन बिलात 16 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.