7th Pay Commission (File Image)

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) लवकच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा थकीत राहिलेला केंद्रीय सातवा आयोग (7th Pay Commission) अन्वये मिळणारा महागाई भत्ता (Dearness Allowance) लवकरच मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने मार्च 2021 मध्ये म्हटले होते की, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) आणि निवृत्ती वेतन धारकांना महागाई सवलत (DR) 1 जुलै 2021 पासून सुरु केली जाईल. दरम्यान, सरकारने 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 या तीन महिन्यांचा महागाई भत्ता थकीत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने हे भत्ते देण्याबाबत अद्याप तरी काही मत व्यक्त केले नाही. मात्र, सरकारसोबत 8 मे रोजी होणारी बैठकही पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता ही बैठक या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. या बैठकीत हा निर्णय होऊ शकतो.

केंद्रीय अर्थमंत्री अनुसार ठाकूर यांनी 9 मार्च 2020 मध्ये राज्यसभेत लिखीत उत्तरात म्हटले होते की, थकीत राहिलेल्या महागाई भत्त्यांचा हप्ता 1 जुलै 2021 पासून नव्या रुपात मिळणार आहे. यात नव्या DAचा समावेश असेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याचे थकीत हप्ते चिंतेचे विषय होते. 1 जुलै पासून जेव्हा महागाई भत्ते दिले जातील तेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात अधिक वाढ झाल्याची पाहायला मिळेल. चर्चा आहे की, महागाई भत्ता 17% नी वाढून तो 28% होऊ शकतो. दरम्यान, जर या हप्त्यावर निर्णय झाला नाही तर 7 वा वेतन आयोगच्या एरियरवर मोठा परिणाम होईल. (हेही वाचा, 7th Pay Commission: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचार्‍यांना अजून एक खूषखबर; Pay Fixation Deadline ला मुदतवाढ)

सातवा वेतन आयोगाचे गणित सोडविण्यासाठी JCM च्या नॅशनल काऊन्सिलचे अधिकारी, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल एंड ट्रेनिंग (DoPT) आणि अर्थ मंत्रालयाचे डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडीचर विभागाचे अधिकारी यांच्यात सातत्याने बैठका सुरु आहेत. या अधिकाऱअयांमध्ये 8 मे या दिवशी एक बैठक पार पडणार होती. परंतू, देशात सुरु असलेली कोरोना महामारी पाहता ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. या बैठकीकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.