Indian Currency | (Photo Credits: PTI)

मोदी सरकारकडून (Modi Government) केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Government Employees) अजून एक खूषखबर देण्यात आली आहे. केंद्राने जारी केलेल्या नव्या परिपत्रकामध्ये त्यांनी पे फिक्सेशनसाठी (Pay Fixation) कर्मचार्‍यांना मुदतवाढ दिली आहे. Ministry of Finance, Department of Expenditure कडून नोटीस काढत 15 एप्रिलला काढण्यात आलेल्या नोटिसीला आता 3 महिन्यांची मुदत वाढ देण्यात आल्याचे सांगितलं आहे. नक्की वाचा: 7th Pay Commission: केंद्रीय सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतन धारकांसाठी खूषखबर; मोदी सरकारकडून DA, DR benefitsचे संकेत, पगारात 'इतकी' घसघशीत होऊ शकते वाढ.

दरम्यान अनेक केंद्र सरकारी कर्मचार्‍यांनी संबंधित विभागाला माहिती देताना सरकारने दिलेल्या वेळेमध्ये पे फिक्सेशन बाबत काम होऊ शकत नसल्याचं सांगत वेळ वाढवून मिळावा यासाठी विनंती करत होते. तज्ञांच्या मते आता सरकारी कर्मचार्‍यांना त्यांचा पगार प्रमोशनच्या तारखेनुसार की इंक्रिमेंटच्या तारखेनुसार हवा आहे यापैकी एकाची निवड करण्यास वेळ मिळाला आहे. ही सरकार कडून देण्यात आलेली शेवटची मुदतवाढ असेल असे देखील सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता 3 महिन्याच्या कालावधीमध्ये कर्मचार्‍यांना आपला निर्णय घ्यायचा आहे.

काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने मागील वर्षभरापासून गोठवलेला कर्मचार्‍यांचा आणि निवृत्तीवेतनधारकांचा DA आणि DR पूर्ववत करण्याचे देखील संकेत दिले होते. माहितीनुसार सरकार मागील 3 प्रलंबित डीए 1जुलै पासून पुन्हा पुर्ववत करण्याची शक्यता आहे.