7th Pay Commission: केंद्रीय सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतन धारकांसाठी खूषखबर; मोदी सरकारकडून DA, DR benefitsचे संकेत, पगारात 'इतकी' घसघशीत होऊ शकते वाढ
Cash | (Archived, edited, representative images) (Photo Credits : IANS)

भारतामध्ये मागील वर्षी कोरोना वायरसने (Coronavirus) घातलेल्या थैमानानंतर देशात मदतीसाठी फंड गोळा करण्याकरिता सरकारी कर्मचारी (Central Government Employees) आणि निवृत्तीवेतनधारकांच्या (Pensioners) डीए वाढीला फ्रीझ करण्यात आले होते. मात्र आता जुलै 2021 मध्ये मागील 3 टप्प्यांमधील ही प्रलंबित महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढ मिळण्याची शक्यता आहे. अद्याप मोदी सरकारकडून त्याची घोषणा करण्यात आलेली नाही परंतू अधिवेशनाच्या काळात मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्याबाबतचे संकेत दिले होते त्यामुळे कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे सध्या लाखो सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांचे लक्ष लागले आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, सरकारी कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 17% वरून 28% होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 11%ची वाढ अपेक्षित आहे. कोरोना संकटामुळे सध्या महागाई भत्ता 17% वर फ्रीझ आहे. पण आता All India Consumer Price Index (AICPI) data च्या रिपोर्टच्या अंदाजानुसार, जानेवारी ते जून 2020 मध्ये 3% वाढ, जुलै ते डिसेंबर 2020 मध्ये 4% वाढ आणि जानेवारी ते जून 2021 मध्ये 4% वाढ अशी एकूण 11% वाढ आता सरकारी कर्मचार्‍यांना मिळण्याचा अंदाज आहे.

महागाई भत्ता आणि डिअरनेस रिलीफ हे त्यांच्या पगारवाढीत थेट प्रभाव टाकत असतात. त्यामुळे आता डीए वाढला तर डीआर देखील वाढण्याची अपेक्षा असल्याने जुलै महिन्यात लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सची दिवाळी होणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान राज्यसभेत केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी लेखी उत्तरामध्ये सरकारी कर्मचारी व पेंशनधारकांना महागाई भत्ता पुन्हा सुरू केला जाईल याची माहिती दिली आहे.त्यावेळेस केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यामध्ये 4% वाढ करून 21% करत असल्याचं मंजुर केले होते. हा 21% महागाई दर 1 जानेवारी 2021 पासून लागू असेल. आणि त्यानंतर तिसर्‍या टप्प्यांतही 4% वाढ करून घसघशीत पगारवाढीची शक्यता आहे.