वकिलांना कोर्टरुमध्ये आयपॅड आणि लॅपटॉप यांसारखी आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यास परवानगी द्यायला हवी. ते जर चित्रपट पाहात नसतील आणि त्यांना रचनात्मक हेतुसाठी त्याचा वापर करायचा असेल त्यांना ही परवानगी मिळायला हवी,असे भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीश म्हणाले की, न्यायालयातील शिस्त आणि शिष्टाचार इतक्या प्रमाणात ताणले जाऊ नये जेणेकरून कोर्टरूममध्ये अशा उपकरणांवर पूर्ण बंदी असेल. आपण लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे. कनिष्ठ आणि तरुण वकिलांना आयपॅडवर काम करु दिले पाहिजे. जोपर्यंत ते चित्रपट अथवा इतर गोष्टी केल्याचे आढळत नाही तोर्यंत, असेही न्यायाधीश म्हणाले.
Lawyers should be allowed to use iPads, laptops in courtrooms provided they are not watching movies: CJI DY Chandrachud
Read more: https://t.co/bOeFS4wlkD pic.twitter.com/0vLCHTBcmA
— Bar & Bench (@barandbench) March 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)