Amit Shah (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरससारख्या महाभयाण विषाणूविरुद्ध लढण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत. यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन देखील ठेवण्यात आला. देशात कोरोना ग्रस्तांचा वाढत जाणारा आकडा त्यात लॉकडाऊनमुळे घरात अडकून पडल्यामुळे अनेकांचे मनोधैर्य कमी होत चालले आहे. त्यामुळे अशांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करुन दारात, खिडकीत किंवा बाल्कनीमध्ये दिवे लावण्यास, टॉर्च पेटवण्यास सांगितले होते. या उपक्रमाला संपूर्ण देशविसायिांनी भरघोस प्रतिसाद दिला. यांच्यासह भाजप ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही सहभाग घेतला.

भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांना आपल्या दारात, खिडक्यात दिवे लावून मोदींच्या उपक्रमात भाग घेतला.

अमित शाह यांचे ट्विट:

राजनाथ सिंह यांचे ट्विट:

जे.पी. नड्डा यांचे ट्विट:

कोरोनाचा प्रभाव अधिक वाढू नये म्हणून देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) घेण्यात आला आहे. या संकटावर मात करण्यासाठी देशवासियांनी एकजूट दाखवावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिवे लावण्याची संकल्पना मांडली होती.

भारतात (India) कोरोना बाधितांची संख्या 3577 वर पोहोचली असून 83 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. हा आकडा पाहता देशातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे हे दिसत आहे. हा विषाणू पसरु नये म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत मात्र तरीही या आकडेवारीवरुन याला आटोक्यात आणणे थोडे चिंताजनक झाल्याचे चित्र समोर येत आहे.