Kumbh Mela वरुन परतणाऱ्यांची RT-PCR चाचणी केल्यानंतरच मिळणार एन्ट्री, जाणून घ्या तुमच्या राज्यातील नियम
Kumbh Mela (Photo Credits-Twitter)

देशात कोरोनाचा व्हायरसची दुसरी लाट आली असून अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दररोज नव्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. रविवारी नवे 2.61 लाख कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान कुंभ मेळ्यात विविध आखाड्यातील 100 हून अधिक साधू-संतांना कोरोनाची लागण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपील केल्यानंतर सहा संन्यासी आखाड्याच्या कुंभांनी आटोपते घेतले आहे. कुंभमध्ये मोठ्या संख्येने लोकांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर येताच राज्य सरकार सतर्क झाले आहे. कुंभ स्नान करुन परतणाऱ्यांसाठी काही राज्यांनी गाइडलाइन्स सुद्धा जाहीर केल्या आहेत. तर येथे जाणून घ्या तुमच्या राज्यात या संदर्भात काय नियम लागू करण्यात आले आहेत.

हरिद्वार कुंभ येथून दिल्लीत येणाऱ्या लोकांना 14 दिवस होम क्वारंटाइन रहावे लागणार आहे. दिल्ली सरकारने एक आदेश जाहीर करत असे म्हटले आहे की, ज्यांच्या कडून याचे उल्लंघन केले जाईल त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. या व्यतिरिक्त 4 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान कुंभ मेळ्यात सहभागी झालेल्यांनी 24 तासांच्या आतमध्ये दिल्ली सरकारची वेबसाइट www.delhi.gov.in वर आपली माहिती अपलोड करावी लागणार आहे. त्याचसोबत अशा लोकांना सुद्धा माहिती द्यावी लागणार आहे जे 18 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान कुंभ मेळ्यासाठी जाणार आहेत.

अहमदाबाद कुंभ स्नान करुन गुजरात मध्ये येणाऱ्यांना आरटी-पीसीआर चाचणी केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही आहे. निगेटिव्ह आल्यानंतरच शहरात प्रवेश मिळणार आहे. पॉझिटिव्ह आल्यास 14 दिवसांसाठी आयसोलेशन मध्ये रहावे लागणार आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी कुंभ मेळ्यावरुन परतणाऱ्यांवर लक्ष ठेवावे अशी निर्देशन दिली आहेत. त्याचसोबत आरटी-पीसीआर तपासाशिवाय आपल्या नगरात परतण्याऱ्यांवर बंदी घालण्यासाठी नाकाबंदी सुद्धा लावावी असे आदेश दिले गेले आहेत.(Madhya Pradesh: धक्कादायक! कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही दोनदा जीव गेल्याचे रुग्णालयाकडून घोषित केल्याचा घरातल्यांचा आरोप)

मध्य प्रदेश सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असे निर्देशन दिले आहेत की, उत्तराखंड मधील हरिद्वार येथे आयोजित होणाऱ्या कुंभ मेळ्यावरुन परतणाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात यावे. तसेच सर्व लोकांनी परतण्यासंदर्भात आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी. गेल्या पाच दिवसात हरिद्वारमध्ये कोरोना व्हायरसचे एकूण 2167 रुग्ण आढळून आले आहेत.

तसेच ओडिशा सरकारने असे म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुंभ मेळ्यावरुन परतणाऱ्या सर्वांची आरटी-पीसीआर चाचणी आणि 14 दिवस क्वारंटाइनच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. लोकांना घरी किंवा वैद्यकिय शिबीर मध्ये क्वारंटाइन होता येणार आहे. या व्यतिरिक्त कुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्यांचा डेटा जिल्हाधिकारी आमि नगर निगम आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे. आदेशात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, अशा सर्वांना व्यक्तिगत रुपात ट्रॅक केले जाणार असून त्यांच्या प्रकृतीकडे सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.(PM Narendra Modi On Kumbh Mela 2021: कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

त्याचसोबत कुंभ मेळ्यावरुन कर्नाटकात येणाऱ्यांना कोरोनाची चाचणी अनिवार्य आहे. राज्याचे आरोग्यमंत्री सुधाकर यांनी याची घोषणा करत असे म्हटले आहे की, हरिद्वार कुंभ मेळ्याच्या येथून येणाऱ्या भाविकांनी एका आठड्यापर्यंत आपल्या घरी क्वारंटाइन रहावे. त्याचसोबत आरटी-पीसीआर चाचणी सुद्धा करावी.