Supreme Court | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला जातो आहे. अशात या महिला डॉक्टरच्या डायरीने काही प्रश्न निर्माण केले आहेत. या प्रकरणाची आता सर्वोच्च न्यायालयाकडून दखल घेण्यात आली असून या प्रकरणाची आता मंगळवारी सुनावणी होणार आहे. (हेही वाचा - Woman Doctor Assaulted at Sion Hospital: मुंबई च्या सायन हॉस्पिटल मध्ये मद्यधुंद अवस्थेतील रूग्ण आणि साथीदारांकडून महिला निवासी डॉक्टरवर हल्ला)

कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टर असलेल्या आहे. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांचा समावेश असलेले तीन न्यायाधीशांचे खंडपीठ मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. 9 ऑगस्ट रोजी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील सेमिनार हॉलमध्ये 31 वर्षीय पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.

या घटनेची न्यायालयाने दखल घ्यावी, अशी विनंती करणारी याचिका शनिवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या घटनेमुळे देशभरात निदर्शने झाली, देशभरातील डॉक्टरांनी या प्रकरणी कारवाईची मागणी करत निषेध केला. या घटनेच्या एका दिवसानंतर, पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला अटक केली. तो या प्रकरणातील प्रमुख संशयित असल्याचे पोलिसांनी सांगितले. नंतर, पोलिस तपासातील त्रुटींचा हवाला देऊन, कोलकाता उच्च न्यायालयाने हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे वर्ग केले.