प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

मुंबई (Mumbai)  मध्ये सायन हॉस्पिटल (Sion Hospital) च्या एका निवासी डॉक्टर सोबत गैरवर्तणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रूग़्ण आणि त्याच्यासोबत असलेल्या काही लोकांनी हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान ही मंडळी मद्यधुंद अवस्थेमध्ये होती. देशात सध्या कोलकाता मधील एका महिला डॉक्टर वर बलात्कार करून तिला ठार मारल्याची घटना ताजी असताना मुंबई मध्येही सायन हॉस्पिटलला एका डॉक्टर सोबत गैर प्रकार झाल्याचं समोर आलं आहे. कोलकाता प्रकरणावरून सध्या देशभर संताप व्यक्त केला जात आहे.

सायन हॉस्पिटल मधील घटना आज रविवार 18 ऑगस्ट पहाटेची आहे. सुमारे 3.30 च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. दारूच्या नशेत असलेल्या 5-6 जणांनी ऑन कॉल निवासी डॉक्टरला छेडलं आहे. Kolkata Rape Murder Case: कोलकता बलात्कार प्रकरणानंतर रुग्णालयात पुरावे नष्ट! भाजप नेते जफर यांनी ममता सरकारवर केला गंभीर आरोप.  

घटनेनंतर रुग्णासह त्याच्या सोबत असलेल्यांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. चेहऱ्यावर जखमा झाल्याने रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. सध्या पोलिसांनी डॉक्टरच्या जबाबावरून तक्रार नोंदवून घेतली आहे. Air Hostess Sexually Assaulted: संतापजनक! हॉटेलमध्ये एअर हॉस्टेसवर लैंगिक अत्याचार, आरोपीवर गुन्हा दाखल .

या घटनेबाबत बोलताना सायन-मार्ड आणि बीएमसी-मार्डचे सरचिटणीस डॉ. अक्षय मोरे यांनी ANI ला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, “मद्यधुंद अवस्थेत 7-8 नातेवाइकांसह रुग्ण मध्यरात्रीनंतर अपघातग्रस्त स्थितीत पोहोचला होता. रुग्णालयात येण्यापूर्वी तो एका हल्ल्यात सामील होता, त्याच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा होत्या. त्याच्या जखमांमुळे, त्याला पहाटे 3:30 च्या सुमारास ईएनटी ला रेफर करण्यात आले. ईएनटी विभागात ऑन-कॉल निवासी डॉक्टर एक महिला होती.” “नियमित प्रक्रियांनंतर, तिने जखमांची तपासणी करण्यासाठी कपडे उतरवले. तेव्हा रुग्णाने तिला शिव्या देण्यास  सुरुवात केली. रुग्णावर नियंत्रण ठेवण्याऐवजी नातेवाईकांनी निवासी डॉक्टरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. बघता बघता गोष्टी हाणामारीपर्यंत गेल्या. परिचारिकांनी हस्तक्षेप केला पण तोपर्यंत डॉक्टरांनी तिच्या हाताला दुखापत झाली होती.  तातडीने सुरक्षा रक्षकाला बोलावण्यात आले.