Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
6 hours ago

Air Hostess Sexually Assaulted: संतापजनक! हॉटेलमध्ये एअर हॉस्टेसवर लैंगिक अत्याचार, आरोपीवर गुन्हा दाखल

डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तेवढ्यात एका एअर हॉस्टेसवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. ही घटना लंडनमधील एका हॉटेलमध्ये घडली.

राष्ट्रीय Pooja Chavan | Aug 18, 2024 10:05 AM IST
A+
A-
rape | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Air Hostess Sexually Assaulted: डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तेवढ्यात एका एअर हॉस्टेसवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. ही घटना लंडनमधील एका हॉटेलमध्ये घडली. एअर इंडियाच्या एअर होस्टेसचे लैंगिक अत्याचार करण्यात आले. ही घटना सेंट्रेल लंडनमधील रॅडिसन हॉटेलमध्ये घडली आहे. (हेही वाचा- आंतरजातीय प्रेमाला विरोध करत बापाने पोटच्या मुलीला संपवले; ग्वालियरमधील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी १५ ऑगस्टच्या मध्यरात्री ही घटना घडली. तरुणी हॉटेलच्या खोलीत झोपली असताना अचानक एक अज्ञात व्यक्ती खोलीत घुसला. त्याने कपड्याच्या हॅन्गरने तिच्यावर हल्ला केला. तरूणीने स्वत: ला वाचण्यासाठी खुप प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोराने तिला जमिनीवर ओढून दरवाजापासून दूर नेले. तरुणीने ओरडण्यास सुरुवात केली. तेवढ्यात तीच्या सहकारी कर्मचारी मदतीला धावले. हल्लेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याला वेळीच सहाकाऱ्यांनी पकडले.

पीडित गंभीर जखमी

हल्ल्यात एअर होस्टेस गंभीर जखमी झालेली आहे. सद्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीच्यावर उपचार झाले असून तीला भारतात पाठवण्यात आले आहे अशी माहिती द हिंदूच्या वृत्तसंस्थेने दिली आहे. तीची प्रकृती स्थिर आहे.

पीडितेला एअर इंडियाकडून मदत

या संतापजनक घटनेनतंर एअर इंडियाने या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे.  एअर इंडियाच्या प्रवक्त्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, "आमच्या एका क्रू मेंबर्सवर झालेल्या या बेकायदेशीर घुसखोरीमुळे आणि हल्ल्यामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. आम्ही आमचे सहकारी आणि त्याच्या टीमला सर्वतोपरी मदत करत आहोत, ज्यामध्ये व्यावसायिक समुपदेशनाचाही समावेश आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल 

या घटनेनंतर स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आला आहे. या पुढे कायदेशीर पाठपुरावा पोलिस करत आहे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सांगितले की, आरोपीची ओळख पटली आहे. मात्र, अद्याप संपुर्ण माहिती मिळाली नाही. त्याला अटक करण्यात आले आहे. या घटनेनंतर हॉटेलच्या व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे. एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणार असल्याचे म्हटले आहे.


Show Full Article Share Now