कोलकाता येथे 7 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त, आरोपींना अटक
कोलकाता येथे7 लाखाच्या बनावट नोटा जप्त, आरोपींना अटक (Photo Credits-ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नोटाबंदी केल्यानंतर देशातील काळा पैसा आणि बनावट नोटांची अनेक प्रकरणे उघडकीस आली. त्यामध्ये आता पुन्हा एकदा कोलकाता (Kolkata) येथे बुधवारी (27 फेब्रुवारी) दोन व्यक्तींकडून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

स्पेशल टास्क फोर्सच्या बनावटी नोटा भारतीय चलन विरोधी पथकाने आरोपींकडून जप्त केल्या आहेत. तसेच बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी या दोघांवर कारवाई करण्यात येणार आहे.

आरोपींकडे 2000 रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या आहेत. तर एकूण मुद्देमाल हा आरोपींकडे 7 लाख रुपयांचा असल्याची माहिती पथकाने दिली आहे. मात्र या बनावट नोटा कोठून आल्या?कुठून पुरवल्या जात होत्या याबाबत पथक अधिक तपासणी करत असल्याचे सांगितले जात आहे.