Kokan Weather Prediction,June29: पुढील पाच दिवसांत कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे.कोकण आणि गोव्यात गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास) सह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.कोकणात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे.रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणातील नद्या नाले प्रचंड भरून वाहताना दिसताय. तर पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सर्वच नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे व सोबतच हवामान खात्याने कोकणाला आँरेज अलर्ट जारी केला आहे.तर सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता कोकणात उद्याचे हवामान कसे असतील ह्यासाठी हवामान विभागने कोकण चे उद्याचे हवामान अंदाज लावला आहे. हेही वाचा: Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाण्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात देखील आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.