Karnataka Shocker: 10 वी मधील मुलीने दिला बाळाला जन्म, आरोपीला POSCO कायद्याअंतर्गत अटक
Arrest. Representational Image. (Photo Credit: ANI)

Karnataka Shocker:  कर्नाटक पोलिसांकडून एका 34 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आले आहे. आरोपीने एका 10 वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याला ताब्यात घेतले असून ही घटना दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील आहे. केशव असे आरोपीचे नाव असून तो उप्पनागडी येथील मडमीट्टीनारू गावात राहणारा आहे. आरोपीच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Tamil Nadu: पोलीस कर्मचाऱ्याला वाटायची भूताची भीती, राहत्या घरात गळफास लावत संपवले आयुष्य)

पीडित मुलीच्या घरातील मंडळींना आरोपीसोबत तिचे लैंगिक संबंध असल्याचे माहिती नव्हते. त्यांना असे वाटत होते की, तिच्या पोटात गाठ झाली आहे. त्यामुळे तिला मंगळुरु येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.(Madhya Pradesh: मुलीच्या प्रेमविवाहाला वडिलांचा विरोध, बलात्कार केल्यानंतर केली हत्या)

दरम्यान, डॉक्टरांनी तिला तपासले असता तेव्हा ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर पीडितेने एका मुलीला जन्म दिला. याबद्दल पोलिसांना कळवण्यात आले. तेव्हा पोलिसांनी चौकशी केली असता तिने आरोपी केशव याच्याबद्दल सांगितले. तर आरोपीला पोलिसांनी अटक करत पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.