Tamil Nadu: पोलीस कर्मचाऱ्याला वाटायची भूताची भीती, राहत्या घरात गळफास लावत संपवले आयुष्य
आपल्याला कधी ना कधी वाईट स्वप्न पडतात. त्यामुळे आपण घाबरतो. याच पद्धतीचा एक प्रकार तमिळनाडू मधील एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडला. त्याला गेल्या काही दिवसांपासून विचित्र स्वप्न पडत होती.
Tamil Nadu: आपल्याला कधी ना कधी वाईट स्वप्न पडतात. त्यामुळे आपण घाबरतो. याच पद्धतीचा एक प्रकार तमिळनाडू मधील एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडला. त्याला गेल्या काही दिवसांपासून विचित्र स्वप्न पडत होती. यामुळे तो ऐवढा घाबरला की, त्याने राहत्या घरात गळफास लावत आयुष्य संपवले. त्याच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. असे ही सांगण्यात आले की, ज्यावेळी त्याने गळफास लावला तेव्हा घरात तो एकटाच होता. या प्रकारामुळे प्रत्येकजण हैराण झाला आहे.
सदर घटना तमिळनाडू येथील कुड्डालोर जिल्ह्यातील आहे. येथील एका 33 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावत आत्महत्या केली. परंतु त्याच्या परिवाराने असे म्हटले की, त्याला नेहमीच भूतांची भीती वाटायची. याचा त्यावर ऐवढा परिणाम झाला की, त्याला खुप त्रास होऊ लागला होता. प्रभाकरण असे त्याचे नाव असून त्याला दोन लहान मुले सुद्धा आहेत. त्याच्या या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला आहे.(Madhya Pradesh: मुलीच्या प्रेमविवाहाला वडिलांचा विरोध, बलात्कार केल्यानंतर केली हत्या)
परिवाराने पुढे असे म्हटले की. प्रभाकरण हा गेल्या काही दिवसांपासून आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करत होता. अशातच त्याच्यावर उपचार ही सुरु होते. तर त्याला वाईट स्वप्न पडत असल्याने तो खुप घाबरायचा. एकच स्वप्न त्याला खुप वेळा पडले असून त्याने तो अत्यंत कावराबावरा व्हायचा. यामध्ये त्याला असे दिसायचे की, एका जळालेल्या महिलेचा तो गळा दाबत होता. तर प्रभाकरण याने ज्योतिषांची सुद्धा मदत घेतली. यामधून बाहेर पडण्यासाठी त्याने 15 दिवसांची सुट्टी ही घेतली आणि पूजा केल्या जाणाऱ्या खोलीत स्वत:ला बंद करुन घेतले.
याच दरम्यान, त्याची दोन मुले आणि पत्नी एका लग्नात गेले. त्याचवेळी त्याने गळफास लावून आत्महत्या केली. जेव्हा घरातील मंडळी परत आली असता तेव्हा त्यांना प्रभाकरण याचे शव लटकलेले दिसल्याने धक्का बसला. याची तातडीने माहिती पोलिसांना दिली गेली. पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर तपास सुरु केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 17, 2021 09:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

