Madhya Pradesh: मुलीच्या प्रेमविवाहाला वडिलांचा विरोध, बलात्कार केल्यानंतर केली हत्या
Representational Image (Photo Credits: Facebook)

Madhya Pradesh: मध्य प्रदेशाची राजधानी भोपाल येथील समसगड जंगालत मिळालेल्या महिलेसह तिच्या मुलाच्या तपासाप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांच्या मते, महिलेच्या हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. असे हे कृत करणारा दुसरा कोणाही व्यक्ती नसून तिचे वडील होते. तर दोन दिवसांपूर्वी दोन जणांना मृतदेह एका विक्षिप्त रुपात मिळाला होता. पोलिसांनी तपास सुरु केला. तेव्हा ते मृतदेह सीहोर जिल्ह्यातील बिलकिसगंज मध्ये राहणाऱ्या महिलेसह तिच्या मुलाचा होता.

पोलिसांनी हत्येप्रकरणी अधिक तपास सुरु केलाा. तेव्हा कसून चौकशी केली असता वडीलाने आपला गुन्हा मान्य केला आणि त्याने जे सांगितले ते ऐकून पोलीस सुद्धा हैराण झाले. पोलिसांना कळले की, मृत महिलेचे एका वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यामुळे परिवारातील सदस्य हे नाखुश होते.वडीलांनी पोलिसांना सांगितले की, प्रेमविवाह केल्यानंतर ती रायपूर येथे निघून गेली. मुलीने घरातून पळून जात लग्न केल्याने त्यांना टोमणे मारले जात आणि समाजात सुद्धा खुप बदनामी झाली.(Madhya Pradesh: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, पीडितेवर आरोपीकडून दोन वर्ष बलात्कार)

मुलगी लग्नानंतर घरी परत आलीच नाही. मात्र दिवाळीनिमित्त जेव्हा ती मोठ्या मुलीलस घरी आली तेव्हा 8 महिन्याच्या मुलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. या सर्व गोंधळात मोठ्या बहिणने जेव्हा वडीलांना फोन करत दु:खद घटनेबद्दल सांगितले असता ते मुलासह रातीबड येथे पोहचले. नवजात मुलाचे शव पुरण्यासाठी मुलीला घेऊन समसगड येथील जंगलात गेले. येथे प्रथम मुलीच्या प्रेमविवाहावरुन वाद झाले. त्यानंतर वडिलांनी संतप्त होत तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. या प्रकरणी आरोपी वडिलांच्या विरोधात आयपीसी कलम 302,376 अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.