Karnataka Horror: अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून बलात्कार, 4 आरोपींना अटक
Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

Karnataka Horror:  कर्नाटक मधील बेळगावी जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर 5 नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, आरोपीकडून 16 वर्षीय मुलीवर जुलै महिन्यात गंतप्रभा परिसरात लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. ही धक्कादायक बाब गुरुवारी उघडकीस आली असल्याचे सांगण्यात येत आहे. चार आरोपी हे सुद्धा गंतप्रभा येथील असून त्यांना 27 ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र यामधील अन्य एक आरोपी अद्याप फरार आहे.(Marital Rape: विवाहीत पत्नीच्या इच्छेविरुद्ध पतीने केलेला संभोग, कोणतीही लैंगिक कृती बलात्कार नव्हे- कोर्ट)

आरोपी हा पीडितेच्या शेजारील व्यक्ती असल्याचे सांगण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, टेलरिंगच्या दुकानातून मुलगी संध्याकाळी घरी आल्यानंतर ही घटना घडली आहे. आरोपीने प्रथम मुलीला चिडवले आणि नंतर तिला तो उसाच्या शेतात घेऊन जात तेथेच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ऐवढेच नव्हे तर या बद्दल कोणाला सांगितल्यास तिला जीवेमारण्याची धमकी सुद्धा आरोपीकडून दिली गेली.

आपली मुलगी तणावात असून नीट खातपीत सुद्धा नाही असे तिच्या पालकांना सतत जाणवत होते. अखेर पीडितेने आपल्या पालकांना तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. घरातील मंडळी हे सर्व ऐकल्यानंतर घाबरली होती. मात्र एका महिन्यानंतर त्यांनी आरोपींच्या विरोधात 26 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली.(Bareli News: मुंबईतील तरुण आपल्या मित्राच्या विमान तिकिटावर करत होता प्रवास, Bareli Airport वर घेतले पोलिसांनी ताब्यात)

आरोपींची ओळख पटली असून त्यांची नावे- सिद्धप्पा रामाप्पा जोकनकट्टी, रामप्पा विट्ठल तसली, रमेश मारुति कोडली,पारसप्पा रयप्पा जट्टन्नावर और इद्दप्पा रामप्पा जोकानाकट्टी. आरोपींच्या विरोधात पोक्सो अॅक्ट आणि अत्याचार प्रतिबंध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना हिंदलगा जेल मध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.