कर्नाटक (Karnataka) राज्यातील कलबुर्गी (Kalburgi) येथे एका 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमन झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. या व्यक्तीचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळेच झाल्याच्या वृत्ताची पुष्टी होऊ शकली नाही. दरम्यान देशभरातील विविध राज्यांतून कोरोना व्हायरस म्हणजेच COVID 19 संक्रमीत रुग्णांची संख्या वाढत आहे. COVID 19 बाधीत रुग्णांचा ताजा आकडा 60 इतका असल्याचे समजते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
कोरोना व्हायरसने जगभगात थैमान घातले आहे. जगभरातील वैद्यक शास्त्रातील तज्ज्ञ कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्यापही त्याला यश मिळू शकले नाही. कोरोना वायरस उगमस्थान असलेल्या चीनमध्ये आतापर्यंत तब्बल 3000 नागरिकांचा बळी गेला आहे. तर, जगभरातही या विषाणूने अनेक नागरिकांचा बळी घेतला आहे. इटलीमध्ये कोरोना व्हायरसची लागण होऊन तब्बल 400 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, जगभरातील कोरोणा व्हायरस बाधित नागरिकांची संख्या ही 1.15 लाखांहून अधिक आहे.
भारतामध्येही महाराष्ट्र, दिल्ली आणि राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसग्रस्त नागरिकांची संख्या वाढताना दिसत आहे. देशभरातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता 60 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्रालयाने म्हटले आहे की, कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोविड-19 (कोरोना व्हायरस) बाधित रुग्णांची संख्या अनुक्रमे पाच आणि दोन इतकी आहे. लद्दाख येथे 2, तर राजस्थान, तेलंगाना, तमिलनाडु, जम्मू-कश्मीर आणि पंजाब येथेही प्रत्येकी एक, केरळमध्ये 9 जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याची ताजी माहिती आहे. (हेही वाचा, राजस्थानमध्ये 85 वर्षांच्या वृद्धाला कोरोना विषाणूची लागण; भारतात Corona Virus संक्रमित रुग्णांची संख्या 62)
एएनआय ट्विट
Ministry of Health & Family Welfare, Government of India: 10 new cases of #COVID19 confirmed. 8 cases are from Kerala and 1 each from Rajasthan & Delhi. Total cases rise to 60 across the country. pic.twitter.com/61eGPUKeiE
— ANI (@ANI) March 11, 2020
सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, दोन मुले आणि दोन गर्भवती महिलांसह 35 लोकांना अलुवा येथील सरकारि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवा ताप आणि श्वसनाचा त्रास होत असलेल्या 10 लोकांना कलामस्सारी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या सर्वांचे नमुने घेण्यात आले असून, हे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. हे सर्व लोक योरोपीय देशांतून कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दाखल झाले होते.