कर्नाटक मध्ये विधानसभा निवडणूकांची (Karnataka Assembly Election) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. अशातच महाराष्ट्रातील काही नेते देखील तेथे जाऊन प्रचार करत आहेत. आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील बेळगावामध्ये पोहचले होते. भाजप उमेदवारांचा प्रचार करताना आज त्यांनी सभेलाही संबोधित केले आहे. दरम्यान आज सभेत बोलताना 'कर्नाटकमध्ये सत्ता आल्यास बजरंग दल आणि पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालू' या कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासन ते बरसले.
कर्नाटकात कॉंग्रेसचे नेते मुख्यमंत्री झाल्यासारखे वागत आहेत. प्रत्येकाला वाटतं आपणच मुख्यमंत्री. त्यांची आता तर मजल इतकी पोहचली आहे की बजरंग दलावर बंदी घालण्याची भाषा करण्यात आली आहे. पण बजरंग दलावर बंदी घालायची कोणाच्या बापाची हिंमत नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. Karnataka Election 2023: महिलांना मोफत बससेवा, 200 युनिट मोफत वीज, जुनी पेन्शन योजना, कर्नाटकात काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध.
काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी RSS वर बंदीची हिंमत केली होती. पण नंतर त्यांनाच सत्तेतून पायउतार व्हावं लागलं होतं. काँग्रेस कर्नाटकमध्ये सत्तेत येणार नाही. पण या निर्णयातून काँग्रेसचा उद्देश दिसून येतो. असे निर्णय घेऊन काँग्रेस नेमकं कुणाचं लांगुलचालन करत आहे? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस मराठी एकीकरण समितीच्या उमेदवारांसमोर उभ्या असलेल्या भाजपा उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आज बेळगावामध्ये आल्याने त्यांना काहींनी काळे झेंडे देखील दाखवले.
जय बजरंग बली !
बेळगाव (कर्नाटक) जिले की उत्तर बेळगाव विधानसभा मतदार क्षेत्र के तिलक चौक में भाजपा के जनप्रिय उम्मीदवार डॉ. रवि पाटिल जी को प्रचंड बहुमत से जिताने के लिए भव्य जनसभा को संबोधित किया। भाजपा के लिए जनता में भारी उत्साह नजर आ रहा है। जनता द्वारा मिले प्यार और सम्मान के… pic.twitter.com/JJjlCtpApe
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 4, 2023
दरम्यान देशात काही ठिकाणी बजरंग दलाचे कार्यकर्तेदेखील आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयाची तोडफोड करत आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही ' जय बजरंग बली' चा नारा देत मतदान करण्याचा सल्ला काल देण्यात आला आहे.