कर्नाटक: PUBG गेम खेळताना मोबाईल हिसकावून घेतल्याने 25 वर्षीय तरुणाकडून वडिलांची हत्या
Pubg Addiction | (Photo credit: archived, edited, symbolic images)

सध्याच्या तरुणाईमध्ये पबजी गेमचे (PUB G) क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मात्र पबजी गेमच्या अतिवापरामुळे त्याचे मानसिक परिणाम झाल्याचा घटना सुद्धा समोर आल्या आहेत. त्यात आता एक भर पडली असून कर्नाटक (Karnataka) मधील एका 25 वर्षीय तरुण पबजी खेळत असताना वडिलांनी त्याच्याकडून मोबईल हिसकावून घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने वडिलांची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रघुवीर कुंभार असे तरुणाचे नाव असून शंकर देवाप्पा कुंभार असे त्याच्या मृत वडिलांचे नाव आहे. रघुवीर याने वडिल शंकर यांच्याकडून पबजी गेमसाठी काही पैसे रविवारी संध्याकाळी मागितले. मात्र वडिलांनी त्याला गेम खेळण्यासाठी पैसे दिलेच नाही. त्यामुळे संतापलेल्या रघुवीर याने शेजाऱ्यांच्या घराचा काचा फोडल्या. या प्रकारावर शेजाऱ्यांनी स्थानिक पोलिसात तक्रार केली. त्यानंतर रघुवीर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन समज दिली.

परंतु सोमवारी सकाळी 4.30 वाजले होते तरीही रघुवीर पबजी गेम खेळत होता. परंतु वडिलांनी त्याचा हा प्रकार पाहून त्याला झोप सांगितले तरीही त्याने गेम खेळणे सुरुच ठेवले होते. मात्र त्यानंतर वडिलांनी रघुवीर याच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला. यामुळे संतापलेल्या रघुवीर याने घरातील विळी घेऊन वडिलांचे हात, पाय आणि मान कापली. मात्र पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला अटक केली आहे.(धक्कादायक! 'Pubg' गेममधील पराभवामुळे आलेल्या नैराश्येतून आयटी इंजिनियर ची आत्महत्या; 4 महिन्यापूर्वी झाला होता विवाह)

सिद्धेश्वर नगर मधील काकटी गावात राहत असून रघुवीर हा पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रामाचे शिक्षण घेत होता. परंतु अभ्यास दुर्लक्ष आणि परिक्षेत सुद्धा काही वेळेस नापास झाला होता. परंतु रघुवीर याला पबजी गेमचे वेड आणि नशेच्या आहारी गेल्याने अभ्यासक्रमात नापास होण्यामागचे मुख्य कारण होते.