कर्नाटक येथे रिक्षा आणि बसचा भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू तर 20 पेक्षा अधिक जखमी
Accident (Photo Credits-ANI)

कर्नाटक (Karnataka) येथे रिक्षा आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तसेच रिक्षात असणाऱ्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे,

बस आणि रिक्षाचा वेग अधिकच जास्त असल्याने एकमेकांची दोघांना धडक लागली. यामध्ये रिक्षाचा चुराडा झाला आहे. तर जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर जखमी झालेल्या 20 पैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. (मध्य प्रदेश: वाहत्या पाण्याच्या ओघात बाईकस्वार बुडाला, नागरिकांनी दक्षता दाखवून तरुणाचा वाचवला जीव Video)

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी मदतकार्य सुरु करण्यात आले आहेत. तसेच मृत जणांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.