मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तेथील नागरिक पावसामुळे सुखावले गेले आहेत. तसेच पुढील दोन दिवसात मध्य प्रदेशातील काही भाग सोडल्यास अन्य ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर खरगोन येथेसुद्धा पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे परिसरातील रस्ते जलमय झालेले दिसून येत आहेत.
खरगोन येथील रस्ते जलमय झाल्याने तेथील नागरिकांना त्रास होत आहे. मात्र याच परिस्थितीत एक बाईकस्वार या मार्गाने जात होता. त्यावेळी अचानक बाईकस्वार रस्त्याच्या मध्ये असलेल्या फटीत पडलेला व्हिडिओतून दिसून येत आहे. मात्र बाईकस्वार स्वत:चा जीव वाचवत बाहेर पडतो. परंतु त्याची बाईक त्या जोरदार पाण्याच्या वेगात वाहून जाते.(धक्कादायक! ओल्या विजेच्या खांबाला स्पर्श केल्याने युवतीचा जागीच मृत्यू; कुटुंबीयांनी केली अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी Video)
#WATCH Madhya Pradesh: A biker was swept away while crossing a flooded road in Khargone. He was later rescued by locals. (02.07.19) pic.twitter.com/uXYK0HlhuL
— ANI (@ANI) July 3, 2019
तसेच तरुण बुडत असलेला पाहून तेथील नागरिकांनी दक्षता दाखवून त्याला बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तर पुढील काही दिवस राज्यात दमदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.