NCPCR Asks States To ban Johnson & Johnson Baby Shampoo Post Adulteration Recorded (Photo Credit: JNJ.com)

Johnson & Johnson Adulteration Case: लहान मुलांच्या नाजूक त्वचेची काळजी घेत असल्याचा दावा करणाऱ्या Johnson & Johnson कंपनीच्या बेबी शाम्पू मध्ये formaldehyde नामक हानिकारक रसायन असल्याचे नुकतेच एका परीक्षणात आढळून आले. याच पार्श्वभूमीवर  राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (National Commission for Protection of Child Rights) देशातील सर्व राज्यांना या उत्पादनाच्या विक्रीवर बंदी आणायचे आवाहन केले आहे. जयपूर (Jaipur) येथील औषध परीक्षण करणाऱ्या प्रयोगशाळेत हा खुलासा झाल्यावर या संबंधी माहिती देत बाल अधिकार विभागाने सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते, त्यानुसार या उत्पादनाचा उपलब्ध माल देखील दुकानांमधून हटविण्यात यावा अशी सूचना करण्यात आली आहे.

Buisness Today च्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी एनसीपीसीआर तर्फे देशातील पाच राज्यांमध्ये Johnson & Johnson कंपनीच्या बेबी शाम्पू आणि हळदीचे काही नमुने हे परीक्षणासाठी पाठवण्यात आले होते. झारखंड, आंध्रप्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम या राज्यांमध्ये हे परीक्षण पार पडले ज्यामध्ये या उत्पादनात एस्बेस्टोस आणि अन्य हानिकारक पदार्थांची भेसळ असल्याचे समोर आले आहे . विधिमंडळ हिवाळी अधिवेशन: दूध, अन्नपदार्थांमध्ये भेसळ केल्यास थेट जन्मठेप; अजामिनपात्र गुन्हाही होणार दाखल- बापट

 राजस्थान मधून आलेल्या अहवालात या बेबी शाम्पू मध्ये रसायन आढळल्याने विक्रीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. तर अन्य चार राज्यांमधील नमुन्यांचे परीक्षण तूर्तास समोर आलेले नाही. एनसीपीसीआरने राजस्थान परीक्षण केंद्राला हळदीच्या नमुन्यांचा अहवाल देखील लवकर तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

 

डिसेंबर 2018 मध्ये देखील Indian drug regulator Central Drugs Standard Control Organization (CDSCO) ने देखील Johnson अँड Johnson कंपनीला परीक्षणाचे अहवाल येईपर्यंत आपल्या बेबी पावडरच्या दोन कारखान्यांचे उत्पादन थांबवण्याचे आदेश दिले होते मागील वर्षीच्या अहवालानुसार एस्बेस्टोस युक्त उत्पादने आढळून आल्यावर Johnson अँड Johnson कंपनीवर कारवाई करण्यात आली होती.