Jellyfish Swarms Invade Goa Beaches: गोव्याच्या समुद्र किनारी जेलीफिशची दहशत; Baga, Calangute, Candolim व Sinquerim बीचजवळ स्टिंगच्या 90 प्रकरणांची नोंद
गोव्यात जेली फिशची दहशत (Photo Credits: Pixabay, Facebook/Drishti Marine)

Jellyfish Swarms Invade Goa Beaches: गेल्या 48 तासांत गोवा किनाऱ्यावर जेलीफिशच्या (Jellyfish) तब्बल 90 पेक्षा जास्त घटनांची नोंद झाली असल्याची माहिती दष्टी मरीन, (Drishti Marine) राज्य सरकारने राज्यातील समुद्र किनारे हाताळणाऱ्या एजन्सीने दिली. जेलीफिश झुंडांनी गोव्याच्या लोकप्रिय समुद्रकिनार्‍यावर, जनतेच्या आवडत्या बागा (Baga) आणि कॅलंगुट (Calangute) या बीचवर आक्रमण केले आहे. जुलै महिन्यात बीच पर्यटनासाठी खुलं करण्यात आले होते आणि येथे बरीच पर्यटकांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची (Goa Beaches) देखभाल करणार्‍या राज्य सरकारने नेमलेली एजन्सी दृष्टि मरीन यांच्या म्हणण्यानुसार, बागा-कॅलंगुट क्षेत्रात सुमारे 55 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर कँडोलिम (Candolim) ते सिनक्वेरिम (Sinquerim) येथे 10 प्रकरणे आढळली आहेत. दक्षिण गोवामध्ये जेली फिशशी संबंधित अपघात होण्याच्या आणखी 25 घटना आढळून आल्या आहेत.

जेली फिशचे डंक सामान्यत: कमीतकमी प्रथमोपचारानंतर बरे करता येतात परंतु त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता असते. परंतु काही दिवस दुर्लक्ष केल्यास ते एलर्जीची प्रतिक्रिया देखील दर्शवू शकतात. एजन्सीनुसार, त्यातील एक प्रकरण थोडे गंभीर होते कारण एका व्यक्तीला पॅरासाईल करताना छातीत दुखले आणि त्याला जेलिफिशने चवल्यांनंतर श्वसनाची समस्या जाणवायला लागली. “जेव्हा त्याला श्वास घेण्यात त्रास होत होता, तेव्हा ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर रुग्णवाहिका बोलवली गेली आणि पीडितेला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले,” एजन्सीने सांगितले. बागा येथे ही घटना घडली. आता समुद्रकिनार्‍याद्वारे सर्व पर्यटकांना पाण्यातील जेलीफिश झुंडाविषयी इशारा देण्यात आला आहे. लॉकडाउन संपल्यानंतर गोव्याचे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी सुरु करण्यात आले होते.

18.11.2020

Jelly fish sting cases across beaches of Goa.

Report from Lifesaver sector head "In North, Baga to...

Posted by Drishti Marine on Wednesday, 18 November 2020

दोन प्रकारचे जेली फिश आहेत- विषारी आणि नॉन-विषारी. त्यांच्या डंकने चिडचिड होते. सामान्य जेलीफिश ब्लूबॉटल जेली फिशइतकी धोकादायक नसते ज्यांना 'पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर' असेही म्हटले जाते. ते स्टिंगिंगवर पुरळाप्रमाणे निशाण सोडतात आणि त्यावर त्वरित उपचार केले पाहिजेत.