Jammu & kashmir: जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलातील जवानांकडून 2 दहशतवादी ठार
Security Forces in Jammu and Kashmir (Photo Credits: ANI)

जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथील कुलगाम (Kulgam) जिल्ह्यातील मंझगाम (Manzgam) भागात आज, 25 मे सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु होती. ANI अपडेटनुसार, 34 राष्ट्रीय रायफल दल (आरआर), केंद्रीय राखीव पोलिस दल आणि कुलगाम पोलिस यांनी एकत्रित रित्या हे ऑपरेशन सुरु केले होते. या ऑपरेशन मध्ये आता 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. मागील दोन महिन्यात जगभरात कोरोनाचे संकट (Coronavirus)  असताना जम्मू काश्मिर भागात दहशतवादी कारवायांचे प्रमाण वाढले आहे. या हल्ल्यांना भारतीय सैन्याकडुन सुद्धा चोख उत्तर देण्यात येत आहे. मात्र या मध्ये अनेकदा सुरक्षा दलातील जवान सुद्धा शहीद झाले आहेत.

दरम्यान, रविवारी, 24 मे रोजी जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी गटातील बेरवाह येथील दहशतवादी वसीम गानी याला बडगाम पोलिस आणि भारतीय लष्कराच्या R 53 आरआर यांनी अटक केली होती.

PTI ट्विट

अगदी अलीकडेच म्हणजे 16 मे रोजी सुद्धा जम्मू काश्मीर मधील बडगाम येथील अरिजाल खानसाहिब या परिसरात असणाऱ्या दहशतवादी तळाला उद्ध्वस्त करण्यात भारतीय सैन्याला मोठे यश आले होते. याठिकाणहून लश्‍कर-ए-तोयबा चा दहशतवादी जहूर वानी याला अटक करण्यात आली होती. यानंतर अवघ्या काही दिवसात सैन्याने ही मोठी कारवाई केली आहे.यांनतर १९ मे रोजी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये भारतीय सुरक्षा दलाने हिजबुल मुजाहिद्दीन या गटातील दोन दहशतवाद्यांना सैन्यातील जवानांनी गोळ्या घालून ठार केले होते.