Indian Army | Image Used for Representational Purpose only | (Photo Credit-PTI)

जम्मू-काश्मीर येथील पुलवामा परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी दहशवादांच्या खात्मा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आज (22/2/2019) पुन्हा एकदा बारामूला (Baramulla) येथील सोपोर (Sopore) येथे दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक सुरु झाली आहे. 2-3 दहशतवाद्यांना घेरले असून दोन्ही बाजूने अंधाधूंद गोळीबार सुरु आहे. या दरम्यान गावातून बाहेर जाण्याचे आणि प्रवेशाचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सोपोर येथील इंटरनेट सेवाही ठप्प करण्यात आली आहे. गुरुवारी (21/2/2019) जवानांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यानंतर सेनेने सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. त्यानंतर दहशवाद्यांनी गोळीबार सुरु केला आणि ही चकमक शुक्रवारी सकाळपासून सुरु आहे.

चकमक सुरु असली तरी लपलेल्या दहशतवाद्यांची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. 14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर पिंगलान येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैनिकांना यश आलं. तर हल्ल्याचा सुत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात आला. मुंबई लोकलवर दशहतवादी हल्ल्याची शक्यता; मुंबईसह महाराष्ट्रात अतिदक्षतेचा इशारा

पुलवामा हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पेणमध्ये बॉम्ब स्फोट झाला. ठाण्यात प्लॅस्टिकचा बॉल फेकून स्फोट घडवून आणण्यात आला. तसंच मुंबईतील रेल्वे स्टेशनवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा इशारा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.