भारताचे नवे माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अश्विनी वैष्णव ( IT Minister Ashwini Vaishnav) यांनी ट्विटरबाबत (Twitter) प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली आहे. देशाचा कायदा सर्वोच्च आहे. त्यामुंळे ट्विटरला नवे डिजिटल नियम पालन करावेच लागेल,असा इशाराच अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिला आहे. वैष्णव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुरुवारी (8 जुलै) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी ट्विटरला सक्त इशारा दिला. काही दिवसांपासून ट्विटर आणि भारत सरकार यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. माजी माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही ट्विटरविरोधात कडक भूमिका घेतली होती.
अश्विनी वैष्णव यांनी रविशंकर प्रसाद यांची जागा घेतली आहे. ट्विटर आणि भारत सरकार यांच्यात झालेल्या संघर्षामुळे रविशंकर प्रसाद जोरदार चर्चेत असत. दरम्यान, भारत सरकार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटल कंटेट बनवणाऱ्या प्लॅटफॉर्म्सवर नवा आयटी कायदा लागू करत आहे. या कायद्यात प्रावधान आहे की, आता ये सर्व प्लॅटफॉर्मस थर्ड पार्टी कंटेंटसाठी जबाबदार असतील. त्यासाठी ट्विटर आता न्यूज जनरेटेड कंटेंटसाठी उत्तरदायी असेन.
नव्या डिजीट नियमांनुसार ट्विटर आणि तशा प्रकारच्या मायक्रोब्लॉगिंग साईट्सना ग्रीवन्स मॅनेजर नेमावा लागणार आहे. कारण कंपनीने यूएसच्या एका अधिकाऱ्याची या पदासाठी नियुक्त केली होती. ज्याने काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला आहे. नव्या कायद्यातील प्रावधानात म्हटले आहे की, हा अधिकारी भारतीय असावा. भारतीय अधिकाऱ्यालाच या पदासाठी नियुक्त करावे.
दरम्यान, ट्विटरने आजच दिल्ली उच्च न्यायालयात म्हटले आहे की, त्यांना भारतीय नागरिकत्व असलेल्या एखाद्या व्यक्तीला ग्रीवान्स ऑफिसर म्हणून नेमण्यासाठी आठ आठवड्यांचा कालावधी मिळावा. ट्विटरला दोन दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने नियमांचे पालन करावे असा इशारा दिला होता. ग्रीवान्स ऑफिसर नियुक्ती करण्याबाबतची मुदत केव्हाच संपली आहे.