INX Media Case: पी. चिदंबरम यांना कोर्टाचा दिलासा; 5 सप्टेंबरपर्यंत ED च्या  अटकेपासून सुरक्षित
Congress leader P Chidambaram. (Photo Credits: PTI)

INX Media घोटाळ्यामध्ये सीबीआयच्या कोठडीमध्ये असलेल्या माजी अर्थमंत्री पी. चिदंबरमसाठी (P Chidambaram) दिलासादायक बातमी आहे. सध्या सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, 5 सप्टेंबर पर्यंत पी. चिदंबरम यांना ईडी अटक करू शकणार नाही. त्यामुळे तूर्तास चिदंबरम यांना हा एक मोठा दिलासा समजला जात आहे.

सुप्रिम कोर्टाने चिदंबरम यांना सीबीआयच्या तापासामधूनही त्यांना दिलासा दिला आहे. INX Media घोटाळ्यामध्ये सीबीआयच्या ट्रायल कोर्टच्या 22 ऑगस्टच्या आदेशाला आव्हान देण्यात आलं होतं. आता पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होणार आहे. दिल्लीमध्ये 22 ऑगस्ट दिवशी चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती. पी चिदंबरम यांना अटक झाली ते INX मीडिया प्रकरण नक्की आहे तरी काय? जाणून घ्या घटनाक्रम

ANI Tweet

चिदंबरम यांच्यासाठी कॉंग्रेसचे पक्षाचे नेते आणि वकील अभिषेक मनू सिंधवी, वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.