Eknath Shinde | (Photo Credits: X)

Eknath shinde On Waqf Board Notice: राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले आहे. माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहेत. तर मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री राहीलेले अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. आज विधानसभेच्या विशेष अधिवशेनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी लातूरमधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून (Waqf Board) आलेल्या नोटीसांबाबत वक्तव्य केले. “हे सामान्य लोकांचे सरकार आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही” असे एकनाथ शिंदे म्हणाले.(Latur Waqf Board Notice: लातूरच्या 100 हून अधिक शेतकऱ्यांना महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून जमिनीबाबत नोटिसा; सरकारकडे न्यायाची मागणी)

दरम्यान आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लातूरमधील शेतकऱ्यांना महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून आलेल्या नोटीसांबाबत मोठे भाष्य केले आहे. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावर पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शेतकरी तुकाराम कानवटे म्हणाले की, “आम्ही या जमिनीवर पिढ्यानपिढ्या शेती करत आहोत. ही वक्फ बोर्डाची मालमत्ता नाही. महाराष्ट्र सरकारने यात हस्तक्षेप करावा. या प्रकरणात आतापर्यंत २ वेळा सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी २० डिसेंबरला होणार आहे. (Waqf Board Notices to Latur Farmers: लातूरमध्ये शेतजमीन कोणाची? शेतकरी की वक्फ बोर्ड? भाजपची चौकशीची मगणी, काय आहे प्रकरण?)

काय आहे प्रकरण?

लातूर जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. इस्लामिक कायद्यानुसार वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा वापर केवळ धार्मिक आणि धर्मादाय कामांसाठी केला जाऊ शकतो. त्यापैकी लातूरच्या 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली आहे. या जमिनीच्या वादात सरकारने हस्तक्षेप करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य वक्फ प्राधिकरणाकडे सुनावणीसाठी गेले आहे. या प्रकरणामुळे तळेगाव, अहमदपूर, लातूर येथील शेतकरी सध्या चिंतेत आहेत.