इन्फोसिसला मोठा झटका; काही मिनिटांमध्ये बुडाले 45 हजार कोटी रुपये
(Photo Credit - File Image )

भारतातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ‘इन्फोसिस’च्या (Infosys) मॅनजमेंटवर सोमवारी गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी या कंपनीचे शेअर्स (Share Stock)  15 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे काही मिनिटांत तब्बल 45 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. इन्फोसिसमधील काही कर्मचाऱ्यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर त्याचे पडसाद शेअर बाराजारात उमटले आहेत.  अभिमानास्पद! जगातील नामांकित कंपन्यांमध्ये Infosys तिसऱ्या स्थानी; टॉप 250 मध्ये भारतातील 17 कंपन्या, पहा यादी

ईन्फोसिसमधील कर्मचाऱ्यांनी ईन्फोसिस आपले उत्पन्न आणि नफ्यांचे आकडे फुगवून सांगत असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये कंपनीचे काही उच्चपदस्थ असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याचेच मंगळवारी शेअर बाजारात उमटले आहेत. इन्फोसिसने कर्मचाऱ्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी केलेले आरोप आणि तक्रारी लेखा विभागाकडे सुपूर्द करण्यात असल्याचेही स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - मुंबई विद्यापीठ च्या 2020 मध्ये BE ते MSc ची पदवी घेणार्‍यांसाठी Infosys सोबत नोकरीची संधी; 15-17 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन टेस्ट

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात इन्फोसिसचे मूल्य 767.75 रुपये येवढे होते. त्यात आज सकाळी 14 टक्क्यांची घरसण झाली आणि ते 645 रुपयांपर्यंत आले. इन्फोसिसच्या शेअरमध्ये जानेवारी ते आजपर्यंत 16 वेळेस दुहेरी अंकानी घसरण झाली आहे.