मुंबई विद्यापीठ च्या 2020 मध्ये BE ते  MSc ची पदवी घेणार्‍यांसाठी Infosys सोबत नोकरीची संधी; 15-17 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन टेस्ट
Representational Image (Photo Credits: Facebook)

Mega Recruitment Drive For MU Students Graduating in 2020:  मुंबई विद्यापीठ आणि इन्फोसिस (Infosys) या अग्रगण्य कंपनीने 2020 साली पदवीधर होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मेगा भरतीचं आयोजन केले आहे. विज्ञान आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात तरूणांना नोकरीच्या नव्या संधीसाठी मुंबई विद्यापीठाने 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान खास शिबीरांचं आयोजन केलं आहे. इंजिनिअरिंगच्या BE, ME, BTech, MTech सह कॉम्प्युटर सायंस शाखेच्या MCA, MSc चे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी याचे खास आयोजन केले आहे. सद्यस्थितीमध्ये अनेक पदवीधारक तरूणांना नोकरीच्या पुरेशा संधी उपलब्ध नाहीत. तर काहींना त्याची योग्य वेळी माहिती मिळत नाही. म्हणूनच यंदा विद्यापीठासोबत इन्फोसीसने एकत्र येऊन काम करण्याची नवी कवाडं उघडली आहेत.

15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान मुंबईतील तीन महत्त्वाच्या ठिकाणी नोकर भरतीच्या मेगाभरतीचं आयोजन केले आहे. यामध्ये काही पूर्व परीक्षा करून योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यामध्ये विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 3.6 लाख रूपयांचे पॅकेज मिळू शकेल असा दावा करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठ आणि इन्फोसिस संलग्न मेगाभरती शिबीराचं वेळापत्रक

15 ऑक्‍टोबर - ठाण्यातील ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (ठाणे)

16 ऑक्‍टोबर - सोमय्या कॉलेज (सायन)

17 ऑक्‍टोबर- ए. पी. शाह कॉलेज (ठाणे)

इंजिनिअरिंग आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना या मेगा नोकरभरतीमध्ये नोकरीची संधी मिळवण्यासाठी काही ऑनलाईन टेस्ट देणं आवश्यक आहेत. यामध्ये अ‍ॅप्टिट्युट, टेक्निकल, प्रोग्रामिंग, कोडिंग, लेखन विषयक तसेच MCQs,प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित आहे.