
"दाई" (Daai) म्हणून ओळखल्या जाणार्या पारंपारिक प्रसूती सेवकाने दीड महिन्याच्या अर्भकाला (Infant) उपचार म्हणून 40 पेक्षा जास्त वेळा लोखंडी सळी तापवून 40 पेक्षा जास्त वेळा चटके दिले आहेत. या घटनेत ते बाळ गंभीर जखमी झाले आहे. ही घटना मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शहडोल जिल्ह्यातील हर्डी गावात घडली. बाळाला न्यूमोनिया (Pneumonia Treatment) झाला होता. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडल्याने स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना वैद्यकीय मदत घेण्यास सांगण्यात आले होते. मात्र, कुटुंबीयांनी पारंपरीक आणि चुकीच्या उपचार पद्धतीचा मार्ग अवलंबला. त्यातून ही भयावह घटना घडली.
सर्वांगाला सळीने दिले डाग:
पीडित अर्भकाचे आईवडील आणि कुटुंबीय मध्य प्रदेशातील हर्डी गावातत रातात. बाळ आजारी असल्याने त्यांनी त्याला गावातील बुटी बाई बायगा नावाच्या 'दाई'के नेले. जी पारंपारिक प्रसूती सेवक म्हणून ओळखली जाते. तिने बालकाला 4 नोव्हेंबर रोजी लोखंडी सळीने चटके देत डागले. बालकाला झालेला न्यूमोनिया बरा होण्यासाठी हताश झालेल्या कुटुंबाने पारंपारिक उपचारबद्धतीची सेवा मागितली होती. त्यातून हा अमानुष प्रकार घडला.
वैद्यकीय तपासणीत बालकाच्या शरीरावर आढळले चट्टे:
बाळाची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला पुन्हा डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत मुलाच्या मानेवर, पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवर 40 हून अधिक चट्टे आढळून आले. क्रूर आणि अपरंपरागत उपचारामुळे बाळाला गंभीर दुखापत झाली, असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.
कायदेशीर कारवाई केली:
बाळाला चटके दिल्याचे पुढे येताच तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात बुटीबाई बेगा, मुलाची आई बेटलवती बेगा आणि आजोबा रजनी बेगा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मादक पदार्थ आणि चुकीचे उपचार कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरीष्ठ प्रशासकीय पातळीवरही या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार पुढील कारवाई केली जात आहे.
वैद्यकीय प्रतिसाद:
बाळाची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले, त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक आता या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. दुसऱ्या बाजूला बाळावरही उपचार सुर आहेत. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.
बाळाची सद्यस्थिती:
मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ आर एस पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मुलाची प्रकृती स्थिर आहे. ही घटना समाजातील विकृत उपचार पद्धीतीचे आणि अनिष्ठ रुढी परंपरांचे प्रतिनिधित्व करते. अशा घटनांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशीही प्रतिक्रिया पांडे यांनी व्यक्त केली.