रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्ध (Russia-Ukraine War) आणि संघर्षाचा विविध क्षेत्रांवर मोठा परिणाम होतो आहे. यात प्रामुख्याने गृहनिर्मण उद्योगाचाही समावेश आहे. महत्त्वाचे असे की, गृहनिर्माण क्षेत्रासाठी लागणारे लोखंड मोठ्या प्रमाणावर महागले आहे. या महागाईची उदाहरण जालना येथे मिळू शकते. जालना (Jalna) हे बांधकामांसाठी लागणाऱ्या सळ्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पाठीमागील आठ ते दहा दिवसांमध्ये सळ्यांचे (Iron Rod) भाव हे प्रतिटन चार हजार रुपयांनी वाढले आहेत.
पाठिमागील आठ, दहा दिवसांपूर्वी याच सळ्यांचे भाव हे प्रति टन 55 हजा रुपये इतका होता. मात्र, युरोप आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तो दर 59 हजार रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग क्षेत्रात या दोन्ही राष्ट्रांचा मोठा प्रभाव आहे. हे दोन्ही देश जगभरातील मोठे लोह खनिज आणि मॅग्नीज पूरवठादार आहेत. त्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लोखंडी सळी उत्पान करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बिलेंटचा पुरवठा केला जातो. तसेच, या उद्योगासाठी लागणारा विशिष्ट प्रकारचा कोळसा इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियामधून पुरवला जातो. त्यामुळे युद्धाचा परिणाम होऊन हा पुरवठा जगभरात विस्कळीत होऊ शकतो. त्यामुळे सळ्यांचे भाव वाढल्याचे येथील जालना स्टील मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष सांगतात. (हेही वाच, रशियाकडून अमेरिकेच्या 'या' टेक कंपन्यांवर बंदी)
रशिया-युक्रेन संघर्षाचा शेअर बाजारावरही मोठा परिणाम पाहायला मिळाला. पाठिमागील काही दिवसांपासून शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर कोसळत आहे. नाही म्हणायला तो अधून मधून वधारताना दिसतो आहे. परंतू पडझड कायम आहे. जगभरातील व्यापारावरही या संघर्षाचा मोठाच परिणाम पाहायला मिळू शकतो असे तज्ज्ञ सांगत आहेत.