World Bank On India's GDP Growth: सन 2023/24 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी वाढिचा दर हा जागतिक स्तरावर 6.3% इतका राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. भारत या काळात सेवा क्षेत्रात 7.4% इतक्या विशेष वाढीसह भक्कम राहील तसेच गुंतवणूकीतही वाढ होऊन ती 8.9% इतकी राहील अशी शक्यताही बँकेने वर्तवली आहे.
जागतिक बँकेने नुकताच आपला इंडिया डेव्हलपमेंट अपडेट (IDU) अहवाल जाहीर केला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, भारतासमोर अनेक जागतिक आव्हाने आहेत. असे असले तरी हा देश सन 02/23 या आर्थिक वर्षामध्ये हा देश जगभरातील वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक होता. त्यामुळे भारत जगाच्या तुलनेत आर्थिक वाढीत दुसऱ्या क्रमांकावरचा देश ठरला. खास करुन G-20 देशांमध्ये. विद्यमान आर्थिक वर्षाच्या (FY2022-23) पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून 2023) भारताची बँक पत वाढ 13.3% च्या तुलनेत 15.8% झाली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जागतिक बँकेचे भारतातील देश संचालक ऑगस्टे तानो कौमे यांनी सांगितले की, भारतासमोर विपरीत जागतिक वातावरणामुळे अल्पावधीत आव्हाने उभी राहतील... सार्वजनिक खर्चाचा वापर करून अधिक खाजगी गुंतवणुकीमुळे भारताला भविष्यात जागतिक संधींचा लाभ घेण्यासाठी अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. भारताने त्याचा योग्य पद्धतीने फायदा उठवला तर भारताची आर्थिक वाढ मोठी राहील.
ट्विट
India expected to grow at 6.3% during current financial year: World Bank
— Press Trust of India (@PTI_News) October 3, 2023
दरम्यान, अहवालात पुढे म्हटले आहे की, भारताची वित्तीय तूट 6.4% वरून 5.9% पर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारची वित्तीय तूट GDP च्या 6.4% वरून 5.9% पर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. तर सार्वजनिक कर्ज GDP च्या 83% वर स्थिर राहणे अपेक्षीत आहे. विद्यमान खात्यातील तूट GDP च्या 1.4% पर्यंत कमी होण्याची शक्यता असल्याचेही ऑगस्टे तानो कौमे यांनी म्हटले आहे.