वंदे भारत एक्सप्रेस (फोटो सौजन्य- ट्वीटर)

सर्वात जुन्या 30 वर्षीय शताब्दी एक्सप्रेसच्या ऐवजी धावणाऱ्या 'ट्रेन-18' या रेल्वेला 'वंदे भारत एक्सप्रेस' (Vande Bharat Express) असे नाव देण्यात आले आहे. या ट्रेनच्या नामकरणासाठी अनेक नावे सुचविली होती. परंतु 'वंदे भारत एक्सप्रेस' हेच नाव ठेवायचे असा निर्णय घेतला असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी सांगितले आहे.

या ट्रेनच्या व्यवस्थेसाठी आणि बनविण्यासाठी 97 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. तर दीड वर्षात ही ट्रेन बनविली गेली आहे. तसेच ट्रेनचा ताशीवेग 160 किमी असणार असून दिल्ली ते वाराणसी पर्यंत धावणार आहे. या ट्रेनमध्ये उत्तम प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे ही ट्रेन मेक इन इंडियाचे उदाहरण असून पहिली इंजन नसलेली ट्रेन आहे.

वंदे भारत एक्सप्रेस या ट्रेनचा मार्ग हा दिल्लीहून सकाळी 6 वाजता सुटणार असून वाराणसी येथे दुपारी 2 वाजताच्या सुमारास पोहचणार आहे. तर वाराणसी येथून दुपारी 2.30 वाजता निघणार असून दिल्लीत ती रात्री 10.30 सुमारास येणार आहे.