देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उद्रेक सुरुच आहे. दिवसागणित वाढणारी रुग्णसंख्या सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवत आहे. मागील 24 तासांत 45,720 नव्या रुग्णांची मोठी भर पडली आहे. तर 1,129 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 12 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 12,38,635 वर पोहचला आहे. त्यापैकी 4,26,167 सक्रीय रुग्ण असून रुग्ण 7,82,606 कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात एकूण 29,861 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिली आहे.
कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांपेक्षा कोरोना संसर्गातून रिकव्हर झालेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत असल्याची माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे. दरम्यान कोविड-19 वर कोणतेही ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसुत्रीच्या माध्यमातून देशातील कोरोनाची परिस्थिती हाताळली जात आहे. त्यामुळे देशात कोविड-19 च्या आतापर्यंत तब्बल 1,50,75369 सॅपल टेस्ट करण्यात आल्या आहेत. (Coronavirus: महाराष्ट्रात आज दिवसभरात 10,576 कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद)
ANI Tweet:
India's #COVID19 case tally crosses 12 lakh mark with highest single-day spike of 45,720 new cases & 1,129 deaths in the last 24 hrs
Total #COVID19 positive cases stand at 12,38,635 incl 4,26,167 active cases, 7,82,606 cured/discharged/migrated & 29,861deaths: Health Ministry pic.twitter.com/PsNwAozRT0
— ANI (@ANI) July 23, 2020
चिंताजनक ! २४ तासात भारतात ४५,७२० कोरोना रुग्णांची नोंद ; रुग्णांचा आकडा १२ लाखांच्या वर पोहचला - Watch Video
कोरोना बाधितांच्या वाढत्या संकटामुळे संपूर्ण जगाचे लक्ष यावरील लसीकडे लागले आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीच्या सकारात्मक परिणामांमुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स सुरु आहेत. त्यामुळे ही लस उपलब्ध होण्यास अजून काही अवधी आहे. त्यामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.