Coronavirus: महाराष्ट्रात आज दिवसभरात 10,576 कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद
Coronavirus In Maharashtra | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात आज दिवसभरात 10,576 कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरातील आकडेवारीसह राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या 3,37,607 इतकी झाली आहे. यात एकूण 12,556 कोरोना मृतांचाही समावेश आहे. राज्यात आज दिवसभरात 280 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.  दरम्यान, कोरना व्हायरस संक्रमितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी रुग्णसंख्या घटू लागल्याने लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील आकडेवारीत मुंबई शहरातील आकडेवारीचा समावेश आहे. मात्र, एकट्या मुंबईतील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे या संख्येची वेगळी दखल घ्यावी लागते. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात आज दिवसभरात कोरोना संक्रमित नव्या 1310 रुग्णांची नोंद झाली. तर उपचार घेऊन प्रकृती सुधारणा झाल्याने आणि बरे वाटू लागल्याने 1563 जणांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला. मुंबईत आज दिवसभरात 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

पीटीआय ट्विट

मुंबई शहरातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 1,04,572 इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन बरे झालेल्या आणि डिस्चार्ज मिळालेल्या 75,118 जणांचाही समावेश आहे. मुंबई आतापर्यंत एकूण 5,872 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (हेही वाचा, COVID19: धारावीत आज आणखी 5 रुग्ण आढळले; एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 507 वर)

एएनआय ट्विट

दूसऱ्या बाजूला देशभरातील कोरोना व्हायरस संक्रमित एकूण रुग्णांची संख्या 1192915 इतकी झाली आहे. त्यातील 753050 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. 411133 जणांवर रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु आहेत. तर 28732 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू जाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे.