Maha Kumbh Mela 2025: पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी (Maha Kumbh Mela 2025) भारतीय रेल्वे (Indian Railway) सज्ज आहे. देशाच्या विविध भागातून प्रवास करणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जवळपास 1,000 विशेष गाड्या धावणार आहेत. याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी माहिती दिली आहे. रेल्वेमंत्र्यांनी प्रयागराज कुंभमेळ्यासाठी (Prayagraj Kumbh Mela 2025) भारतीय रेल्वेच्या तयारीबद्दल तपशील शेअर केला. कुंभमेळा 2025 साठी भारतीय रेल्वे विक्रमी संख्येने गाड्या, अपग्रेड केलेले ट्रॅक आणि भाविकांसाठी चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी सज्ज असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं आहे.
12 जानेवारीपासून धावणार विशेष रेल्वे गाड्या -
12 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत यात्रेकरूंसाठी विशेष ट्रेन आणि प्रवासी सुविधा सुरू केल्या जातील, असंही अश्विनी वैष्णव यांनी नमूद केलं आहे. प्रयागराज भागातून दररोज 140 ट्रेन धावतील. याशिवाय विशेष गाड्यांसाठी 174 रेकचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांसाठी प्रवासी निवारा, दिवे, सुरक्षा, सीसीटीव्ही यंत्रणा, स्वच्छतागृह सुविधा, आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 850 सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. (हेही वाचा -Ashwini Vaishnav Angry on Opponents: संसदेत विरोधकांनी 'रील मिनिस्टर' म्हटल्यानंतर संतापले रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव; म्हणाले, 'आम्ही फक्त रील बनवणारे नाही, काम करणारे लोक आहोत')
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची एक्स पोस्ट -
🙏 *कुंभ मेला - विश्व का सबसे बड़ा धार्मिक समागम!*
🚉 भारतीय रेलवे कुंभ मेला 2025 के लिए रिकॉर्ड ट्रेनें, उन्नत ट्रैक और श्रद्धालुओं के लिए बेहतर सुविधाएं प्रदान करने के लिए तैयार है!
🧵जानिए सभी रेलवे सुविधाएं👇🏻 pic.twitter.com/4qrfCKCIzk
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) September 29, 2024
विशेष गोलाकार ट्रेन मार्ग -
प्रयागराज - अयोध्या - वाराणसी - प्रयागराज
प्रयागराज - वाराणसी - अयोध्या - प्रयागराज
10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल कुंभमेळ्याची तयारी -
महाकुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संगम परिसरात पोहोचलेले प्रधान सचिव अमृत अभिजात यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभमेळ्याची तयारी 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी पुढील 40-45 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. चार-पाच विभागात रस्ते रुंदीकरणाचे काम करत आहेत. पावसामुळे काम संथगतीने सुरू होते. मेळ्यासाठी सुमारे 34 विभाग कार्यरत आहेत.
अमृत अभिजात यांनी सांगितले की, मेळ्याच्या तयारीबाबत दररोज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका घेतल्या जात आहेत. कुंभमेळ्यात लोकांचे स्वागत करण्यासाठी बांधलेले दरवाजे अतिशय सुंदर असतील. तथापी, वेब तंत्रज्ञान, व्हॉट्सॲप आणि माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाविकांचा प्रवास अतिशय सोपा होणार आहे. याशिवाय आरोग्य आणि पिण्याचे पाणी इत्यादींमध्ये लक्षणीय सुधारणा होईल.