Railway Minister Ashwini Vaishnav (PC - X/ANI)

Ashwini Vaishnav Angry on Opponents: संसदेत काँग्रेस पक्षाच्या आरोपांना उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) संतापले. 'आम्ही फक्त रील बनवणारे नाही, आम्ही काम करणारे लोक आहोत', असं अश्विनी वैष्णव म्हणाले. रेल्वे अपघातांवर (Railway Accident) विरोधकांच्या गदारोळावर नाराजी व्यक्त करताना रेल्वेमंत्री म्हणाले की, 'जे इथे ओरडत आहेत त्यांना विचारायला हवे की 58 वर्षांच्या सत्तेत एका किलोमीटरसाठीही ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) का बसवता आले नाही? दरम्यान, संसदेत बोलत असताना विरोधी खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे रेल्वेमंत्री संतापले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना संतप्त होऊन सांगितले की, चुप रहा, बसा...बसा, काहीही बोलू नका. आज ते हा प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस करत आहेत. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना अपघाताचा आकडा 0.24 वरून 0.19 वर आला तेव्हा हे लोक सभागृहात टाळ्या वाजवायचे. आता हाच आकडा 0.19 वरून 0.03 झाला आहे. तरी हे असे आरोप करत आहेत. (हेही वाचा -

यावेळी अश्विनी वैष्णव यांनी काँग्रेस सोशल मीडियावर आपल्या ट्रोल आर्मीच्या माध्यमातून खोटे बोलत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, 'अयोध्येत स्टेशनची जुनी भिंत कोसळली. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने हा मुद्दा लगेच उचलण्यास सुरुवात केली. अशा खोटेपणाने देश कसा चालेल? ते नेहमी रेल्वेने प्रवास करणाऱ्या दोन कोटी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा सवालही यावेळी अश्विनी वैष्णव यांनी केला. (हेही वाचा - World's Highest Chenab Railway Bridge: जगातल्या सर्वात उंच पुलावर ट्रेनची ट्रायल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला व्हिडिओ)

दरम्यान, रेल्वेमंत्र्यांनी संसदेत सांगितले की, अपघात रोखण्यासाठी देशभरात मानवरहित रेल्वे क्रॉसिंग तयार करण्यात आले आहेत, जिथे दरवर्षी स्कूल बस किंवा इतर काही अपघात होत असतं. स्टेशन्सचे संपूर्ण नियंत्रण इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगद्वारे केले जाते. 1980-90 च्या दशकात जगातील मोठ्या देशांमध्ये याची सुरुवात झाली. 2014 मध्ये सरकार आल्यानंतर आम्ही 2015 मध्ये एटीपी विकसित करण्याचा संकल्प केला आणि 2016 मध्ये कवचच्या चाचण्या सुरू झाल्या. कोविड असूनही, 2020-21 मध्ये विस्तारित चाचण्या घेण्यात आल्या. 2023 मध्ये तीन हजार किलोमीटरचा प्रकल्प आणण्यात आला. (हेही वाचा - Ashwini Vaishnaw As Minister Of Railways : रेल्वेमंत्री म्हणून अश्विनी वैष्णव दुसऱ्यांदा मंत्री पद संभाळण्यास सज्ज, कार्यलयात पंतप्रधानाचं कौतुक)

पहा व्हिडिओ -

 

15 दिवसांत 8 वेळा रेल्वे अपघात -

सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांमुळे विरोधक रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. इतके रेल्वे अपघात होत असताना रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सतत विरोधी पक्षाकडून होत आहे. गेल्या 15 दिवसांत आठ रेल्वे अपघात झाले आहेत. फक्त जुलै महिन्याबद्दल बोलायचे झाले तर 18 जुलै रोजी चंदीगड-दिब्रुगड रेल्वे अपघात झाला होता, ज्यामध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 31 जण जखमी झाले होते. 19 जुलै रोजी गुजरातमधील वलसाडमध्ये मालगाडी रुळावरून घसरली. 20 जुलै रोजी यूपीच्या अमरोहा येथे मालगाडीचे 12 डबे रुळावरून घसरले. 21 जुलै रोजी राजस्थानमधील अलवरमध्ये मालगाडीचे तीन डबे रुळावरून घसरले. 21 जुलै रोजी पश्चिम बंगालमधील राणाघाट येथे मालगाडी रुळावरून घसरली होती.