Indian Railway: प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! युपी, दिल्ली आणि मुंबई दरम्यान धावणार 'या' स्पेशल ट्रेन, पहा वेळापत्रक
Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

Indian Railway: कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. अशातच भारतीय रेल्वेकडून गाड्यांची संख्या वाढवण्यावर जोर दिला जात आहे. प्रवाशांसाठी सुविधा आणि प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वेकडून काही स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने तीन स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार असल्याची घोषणा केली आहे.(Piyush Goyal On Clean environment: स्वच्छ पर्यावरण आणि समावेशक विकास हेच भारताचे अग्रक्रम- पियुष गोयल)

गाडी क्रमांक 04137 प्रयागराज-आनंदविहार सुपरफास्ट हमसफर स्पेशल एक्सप्रेस ही आठवड्यातील तीन दिवस धावणार आहे. ही ट्रेन 23 जून पासून सुरु होणार आहे. प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शनिवारी ही पुढील आदेशापर्यंत चालणार आहे. प्रयागराज येथून ही गाडी 22.30 वाजता रवाना होणार असून 06.05 वाजता आनंद विहार येथे पोहचणार आहे. गाडी क्रमांक 04138 आनंद विहार-प्रयागराज स्पेशल 24 जून पासून प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणि रविवारी चालविली जाणार आहे. आनंद विहार येथून काही गाडी 22.35 वाजता रवाना होणार असून 6.20 वाजता प्रयागराज येथे पोहचणार आहे. ही गाडी फक्त कानपूर सेंट्रल येथे थांबणार आहे.

Tweet:

ट्रेन क्रमांक 05401 गोरखपुर-लोकमान्य टिळक पूर्ण आरक्षित ग्रीष्मकालीन स्पेशल ट्रेन गोरखपूर येथून 6 जून, 23 जून, 30 जून आणि 7 जुलै रोजी चालवली जाणार आहे. गोरखपुर येथून ही ट्रेन 19.00 वाजता रवाना होणार असून 05.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचणार आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ही ट्रेन 18 जून, 25 जून, 2 जुलै आणि 9 जुलै रोजी 07.05 वाजता चालवली जाणार असून 16.15 वाजता गोरखपूर येथे पोहचणार आहे. ही गाडी कानपूर सेंट्रल, भरवा सुमेरपुर, रागौल, बांदा आणि चित्रकूट स्थानकांवर थांबणार आहे.(Indian Navy Bharti 2021: नौसेनेत नोकर भरती, SSC Officer पदासाठी करता येणार अर्ज)

तसेच गाडी क्रमांक 05403 गोरखपुर-वांद्रे ग्रीष्मकालीन स्पेशल ट्रेन 18 जून रोजी गोरखपूर येथून 05.00 वाजता रवाना होणार आहे. तर 14.25 वाजता वांद्रे स्थानकात दाखल होणार आहे. त्याचसोबत 19 जूनला ही ट्रेन (05404) वांद्रे येथून 19.25 वाजता धावणार असून 6.45 वाजता गोरखपूर येथे पोहचणार आहे. ही गाडी कानपूर सेंट्रल, मथुरा जंक्शन, अछनेरा जंक्शन आणि भरतपुर येथे थांबणार आहे.