India Railway (File Image)

RRB Technician Recruitment 2024: भारतीय रेल्वेत (Indian Railway) सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आहे. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने तंत्रज्ञ ग्रेड 1 सिग्नलच्या 1,092 रिक्त जागा आणि तंत्रज्ञ ग्रेड 3 च्या 8,052 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी पात्र असलेले उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. ऑनलाइन अर्ज RRB च्या अधिकृत वेबसाइट www.rrbapply.gov.in वर भेट देऊन भरला जाऊ शकतो. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल 2024 निश्चित करण्यात आली आहे.

पात्रता-

अहवालानुसार, टेक्निशियन ग्रेड I सिग्नल पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स/संगणक/आयटी/इंस्ट्रुमेंटेशनसह पदवी किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा B.Sc ची पदवी (मान्यताप्राप्त विद्यापीठातून) आवश्यक आहे.

तर टेक्निशियन ग्रेड III पदांसाठी, संबंधित ट्रेडमध्ये ITI पदवीसह 10वी पास असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा-

अर्जदाराचे वय टेक्निशियन ग्रेड I सिग्नलसाठी 18 ते 36 वर्षे आणि टेक्निशियन ग्रेड III साठी 18 वर्षे ते 33 वर्षे दरम्यान असावे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही शासकीय नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क-

सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क 500 रुपये भरावे लागतील. तर SC/ST, माजी सैनिक, PWBD, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून केवळ 250 रुपये भरावे लागतील.

निवड प्रक्रिया-

या पदांसाठी अर्जदारांची निवड संगणक आधारित चाचणी-I (CBT-I), संगणक आधारित चाचणी-II (CBT-II) आणि दस्तऐवज पडताळणीद्वारे केली जाईल. RRB ने अद्याप भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. (हेही वाचा: India's Retail Inflation in February: फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई 5.09 टक्क्यांवर; गेल्या चार महिन्यांतील नीचांकी पातळी)

टेक्निशियन CBT-1 परीक्षेत गणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, सामान्य विज्ञान, सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडी या विषयांशी संबंधित 75 प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी 1 तासाचा असेल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासू शकता.