भारतीय नौदलाचे तेजस विमान (Tejas Fighter Jet Crash) प्रशिक्षणादरम्यान कोसळले. ही घटना राजस्थान राज्यातील जैसलमेर येथील विद्यार्थी वसतिगृहाजवळ घडली. विमानातील दोन्ही पायटना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष उल्लेखनिय असे की, तेजस विमान भारतीय बनावटीचे आहे. साधारण 23 वर्षांपूर्वी म्हणजेच सन 2001 पासून हे विमान भारतीय लष्कराच्या सेवेत आहे. तेव्हापासून आतापर्यंत या विमानाचा अपघात (Indian Army plane crashes) घडल्याची एकही घटना घडली नव्हती. त्यामुळे तेजस विमानाच्या अपघाताची ही पहिलीच वेळ आहे.
हवाई दलाकडून स्पष्टीकरण
हवाई दलाने सांगितले की, पायलटला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, हवाई दलाने सांगितले की, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विमान अपघाताबाबत सोशल मीडिया मंच X वर दिलेल्या माहितीनुसार हवाई दलाने म्हटले आहे की, 'भारतीय हवाई दलाच्या एका तेजस विमानाचा आज जैसलमेर येथे ऑपरेशनल ट्रेनिंग सोर्टी दरम्यान अपघात झाला. वैमानिक सुखरूप बाहेर पडला. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्यात आली आहे'. (हेही वाचा, Sukhoi-30 and Mirage 2000 Aircraft Crash: सुखोई-30 आणि मिराज 2000 विमाने कोसळून अपघात, मध्य प्रदेशातील मुरैन परिसरातील घटना)
भारतीय बनावटीचे तेजस
तेजस फायटर जेट हे भारताच्या सरकारी मालकीच्या एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने विकसित केलेले मल्टीरोल, सिंगल-इंजिन, हलके लढाऊ विमान आहे. "रेडियंस" या संस्कृत शब्दावरून नाव दिलेले तेजस हे भारतीय वायुसेनेच्या (IAF) गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले भारतातील पहिले स्वदेशी सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे.
एक्स पोस्ट
One Tejas aircraft of the Indian Air Force met with an accident at Jaisalmer, today during an operational training sortie. The pilot ejected safely.
A Court of Inquiry has been constituted to find out the cause of the accident.
— Indian Air Force (@IAF_MCC) March 12, 2024
तेजस फायटर जेट हे भारताच्या संरक्षण उद्योगातील एक महत्त्वपूर्ण कामगिरीचे प्रतिनिधित्व करते, जे स्वदेशी नवकल्पना, तांत्रिक प्रगती आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी देशाच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. तेजस प्रकल्प संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. हे देशाच्या एरोस्पेस अभियांत्रिकी क्षमतांचे प्रदर्शन करून संपूर्णपणे भारतात डिझाइन, विकसित आणि उत्पादित केले गेले आहे. तेजस संमिश्र साहित्य वापरून तयार केले आहे आणि लढाऊ ऑपरेशन्स दरम्यान चपळता आणि कुशलता सुनिश्चित करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. त्याचे हलके बांधकाम वर्धित कार्यक्षमता आणि इंधन कार्यक्षमतेत योगदान देते. तेजस आधुनिक एव्हीओनिक्स, रडार प्रणाली आणि शस्त्रे प्लॅटफॉर्मसह सुसज्ज आहे, ज्यामुळे ते हवाई श्रेष्ठता, जमिनीवर हल्ला, टोपण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध यासह विविध लढाऊ मोहिमे पार पाडू शकतात.