दिवसागणिक भारतामध्ये कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. दरम्यान मागील 24 तासांत भारतामध्ये 83,809 नवे रूग्ण तर 1,054 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. सध्या भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 49 लाखांच्या पार गेला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, पाहा आजचे ताजे अपडेट्स.
भारतामध्ये सध्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 49,30,237 पर्यंत पोहचला आहे. त्यामध्ये अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 9,90,061 आहे तर आत्तापर्यंत सुमारे 38,59,400 रूग्णांनी कोरोना व्हायरसमुळे होणार्या कोविड 19 या आजारावर मात केली आहे. तर 80,776 जणांची कोरोनाविरूद्धची लढाई अयशस्वी ठरली आहे. RT-PCR, Antigen, Antibody Test: कोविड 19 चं निदान करण्यासाठी केल्या जाणार्या विविध COVID Tests टेस्ट मधील नेमका फरक काय ते कोणती चाचणी कधी करावी?
आज ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये आत्तापर्यंत 5,83,12,273 नमुन्यांची तपासणी झाली आहे. तर काल दिवसभरामध्ये 10,72,845 नमुने कोविड 19 साठी तपासण्यात आले आहेत.
ANI Tweet
India's #COVID19 case tally crosses 49-lakh mark with a spike of 83,809 new cases & 1,054 deaths in last 24 hours.
The total case tally stands at 49,30,237 including 9,90,061 active cases, 38,59,400 cured/discharged/migrated & 80,776 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/il5RGbtiFG
— ANI (@ANI) September 15, 2020
भारतामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना व्हायरस पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यात आकडेवारी चिंताजनक बनत चालली आहे. दरम्यान महाराष्ट्राने 10 लाख रूग्णसंख्येचा टप्पा ओलांडल्याने सध्या रशिया देशापेक्षाही केवळ भारत देशातील एका महाराष्ट्र राज्यात रूग्णसंख्या अधिक झाली आहे. राज्यात पुणे जिल्हा हा सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्णांचा जिल्हा बनला आहे.
दरम्यान भारतामध्ये अद्यापही कोरोनाची लस, ठोस औषध उपलब्ध नाही मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून काल डॉ. हर्षवर्धन यांनी 2021 च्या सुरूवातीला भारतीय लस उपलब्ध होऊ शकते असा विश्वास व्यक्त केला आहे.