Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, पाहा आजचे ताजे अपडेट्स
Coronavirus (Photo Credits: Twitter)

जगभरात हाहाकार माजविणारा कोरोना व्हायरस (Coronavirus) महाराष्ट्रातही गेल्या 6 महिन्यांपासून ठाण मांडून बसला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मागील 24 तासांत राज्यात 17,066 नवे रुग्ण आढळले असून 257 रुग्ण (Coronavirus Death) दगावल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने (Maharashtra Health Department) दिली आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 लाख 77 हजार 374 वर (Coronavirus Cases) पोहोचली आहे. ही संख्या राज्यातील कोरोनाची बिकट परिस्थिती दर्शवित आहे. राज्यात सद्य घडीला 2 लाख 91 हजार 256 रुग्णांवर (Coronavirus Active Cases) उपचार सुरु आहेत. तर राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे.

मागील 24 तासांत राज्यात 15,789 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 7 लाख 55 हजार 850 रुग्णांनी (Coronavirus Recovered Cases) कोरोनावर मात केली आहे. राज्यात मुंबई पाठोपाठ पुण्यानेही कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 20 हजारांच्या पार गेली आहे. Coronavirus Update In Pune: पुणे शहरात आज 1100 नवे कोरोनाग्रस्त; तर 1456 जणांना डिस्चार्ज

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (14 सप्टेंबर रात्री 8: 00 वाजेपर्यंत)  

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
अहमदनगर 7352 446 22315 30113
अकोला 1716 181 3585 5483
अमरावती 2824 195 5566 8585
औरंगाबाद 7172 762 21883 29817
बीड 2201 192 4640 7033
भंडारा 1889 45 1082 3016
बुलढाणा 1803 97 3498 5398
चंद्रपूर 2958 61 2625 5644
धुळे 1915 281 8704 10902
गडचिरोली 318 2 938 1258
गोंदिया 1426 31 1833 3290
हिंगोली 557 48 1547 2152
जळगाव 10239 1035 26822 38096
जालना 1800 170 4037 6007
कोल्हापूर 9239 968 23007 33214
लातूर 4437 358 7936 12731
मुंबई 31123 8181 132347 172010
नागपूर 20826 1358 29865 52053
नांदेड 5715 308 5507 11530
नंदुरबार 1107 100 2830 4037
नाशिक 12437 1061 42096 55594
उस्मानाबाद 2636 238 6152 9026
इतर राज्ये 573 102 428 1103
पालघर 5525 719 24943 31187
परभणी 1346 128 2742 4216
पुणे 78284 4838 152297 235419
रायगड 10288 929 30894 42113
रत्नागिरी 2786 183 3418 6387
सांगली 10180 771 14708 25659
सातारा 8641 600 15620 24863
सिंधुदुर्ग 1128 40 1307 2475
सोलापूर 7200 970 19536 27707
ठाणे 30276 4301 124330 158908
वर्धा 759 26 1491 2277
वाशिम 744 52 2057 2854
यवतमाळ 1836 117 3264 5217
एकूण 291256 29894 755850 1077374

तर मुंबईत 2256 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,71,949 इतकी झाली आहे. तर शहरात सध्या कोरोनाचे एकूण 31,063 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1,32,349 जणांची प्रकृती सुधारली आहे. तसेच एकूण 8178 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.