Coronavirus Update In Pune: पुणे शहरात आज नव्याने 1100 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आता पुणे शहरातील एकूण संख्या आता 1 लाख 20 हजार 757 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज शहरातील 1456 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे या सर्वांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरळीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.
शहरात आज 1456 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 100532 झाली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्वांचे मुरळीधर मोहोळ यांनी आभार मानले आहेत. आज पुणे महापालिका हद्दीत नव्याने 39 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 2 हजार 832 इतकी झाली आहे. (हेही वाचा - COVID19 Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 17,066 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 257 जणांचा मृत्यू)
कोरोनामुक्त संख्येने १ लाखांचा टप्पा ओलांडला !
शहरातील १,४५६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या १,००,५३२ झाली आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद !#PuneFightsCorona pic.twitter.com/1XrLY2GRQ3
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 14, 2020
दरम्यान, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 17 हजार 393 रुग्णांपैकी 928 रुग्ण गंभीर असून यातील 479 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 449 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात 2 हजार 807 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 5 लाख 37 हजार 453 इतकी झाली आहे.