COVID19 Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 17,066 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 257 जणांचा मृत्यू

COVID19 Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. आज राज्यात 17,066 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 257 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय आज 15,789 जणांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

COVID19 Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 17,066 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 257 जणांचा मृत्यू
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: IANS)

COVID19 Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. आज राज्यात 17,066 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 257 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय आज 15,789 जणांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळून आलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 10,77,374 इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यंत 7,55,850 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात 2,91,256 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने (Public Health Department, Maharashtra) माहिती दिली आहे. (हेही वाचा - My Family My Responsibility Campaign: माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम परिणामकारकपणे राबवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश)

दरम्यान, मुंबई शहरामध्ये आज 2,256 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 31 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1,71,949 इतकी झाली आहे. सध्या 31,063 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय आतापर्यंत 1,32,349 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 8,178 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2020 09:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).