Tricolor Decoration Historical Monuments (Photo Credits: ANI)

देशात कोरोना व्हायरस संकटाच्या (Coronavirus Pandemic) पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिम जानेवारी महिन्यापासून सुरु आहे. या अंतर्गत आता 100 कोटी लसींचे डोसेस देण्याचे ऐतिहासिक लक्ष्य साध्य केले आहे. भारतात आज सकाळी 9.48 वाजेपर्यंत 100 कोटी डोसेस देण्यात आले आहेत. हे ऐतिहासिक लक्ष्य साध्य केल्यानंतर देशातील 100 ऐतिहासिक स्मारकं तिरंगी रंगात सजवण्यात आली आहेत. देशातील 100 कोटी कोविड -19 लसीकरणाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या स्मरणार्थ भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने राष्ट्रीय ध्वजाच्या रंगात भारतातील 100 स्मारकांना तिरंगी रोषणाई केली आहे. देशभरातील या स्मारकांची आकर्षक चित्रे आणि व्हिडिओ समोर आले आहेत. पाहुया काही खास व्हिडिओ आणि फोटोज: (COVID 19 Vaccination In India: भारतामध्ये 100 कोटी कोविड 19 लस देण्याचा ऐतिहासिक टप्पा पार)

कोलकात्यातील जुनी चलन इमारत आणि मेटकाल्फ हॉल तिरंग्याच्या रंगांनी सजवण्यात आली.

राजधानी दिल्लीत गुरुवारी संध्याकाळी हुमायूंची थडगी तिरंग्याच्या रंगांनी उजळून निघाली.

हैदराबाद येथील चार मीनार तिरंग्याच्या दिव्यांनी उजळले.

त्रिपुराच्या राजनगरातील भुवनेश्वरी मंदिर तिरंग्याच्या रंगांनी उजळून निघाले होते.

दिल्लीतील कुतुब मीनारही तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाले.

दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगी रोषणाई:

तिरंगी रंगातील ICMR चे फोटोज:

जम्मू -काश्मीर मधील श्रीनगर येथील शंकराचार्य मंदिर तिरंग्याच्या प्रकाशाने उजळून निघाले होते.

कुंभलगढ किल्ला, चार मीनार, आग्रा किल्ला आणि कुतुबमिनारचे फोटोज:

बेंगलोरमधील टिपू सुलतान समर पॅलेसचे दृश्यं:

दरम्यान, भारतातील सुमारे 75 टक्के प्रौढांना लसीचा एक डोस मिळाला आहे. तर 31 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 102 कोटींपेक्षा जास्त डोस दिले आहेत.