India - China Tensions: नेपाळ सरकारचं भारताला पत्र; भारत आणि चीन आपल्यातील वाद शांततेने सोडवतील असा वर्तवला विश्वास, वाचा सविस्तर
Narendra Modi, Xi Jinping, K P Sharma Oli (Photo Credits: PTI)

भारतात अगोदरच सुरु असणाऱ्या कोरोना संकटकाळात (Coronavirus In India) भर म्हणून आता शेजारील देशांकडून भारतीय जमीन लादण्याची प्रयत्न केले जात आहेत, एकीकडे नेपाळ (Nepal) ने उत्तराखंडातील भारताची जागा आपल्या नकाशात जोडण्याचा प्रकार केला आहे तर दुसरीकडे भारताचा जुना मित्र चीन (China) ने लडाख (Ladakh) मधील गलवान व्हॅली (Galwan Valley) मध्ये अतिक्रमण सुरु केले आहे. यातूनच आता भारत विरुद्ध चीन (India Vs China) अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी नेपाळने भारताला पत्र लिहून भारत आणि चीन आपल्यातील बिघडलेले संबंध शांततेच्या मार्गाने नक्की सोडवतील असा विश्वास वर्तवला आहे. मैत्रीच्या भावनेने, द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक शांतता आणि स्थिरतेला टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही देशांनी आपले मतभेद संपवावेत असेही नेपाळ सरकारच्या पत्रात म्हंटले आहे. Galwan Valley: 1962 मध्ये सुद्धा गलवान व्हॅली भागात चीन ने भारताला दिला होता धोका,आता पुनरावृत्ती वाचा सविस्तर

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून हे पत्र आज पाठवण्यात आले. नेपाळ हा प्रादेशिक आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने सहकार्य करणारा देश आहे. त्यामुळे आपल्या शेजारील मित्र देशांनी म्हणजेच भारत व चीन ने सुद्धा गलवान व्हॅली वरून सुरु असणारे मतभेद शांततेने सोडवावेत असे या पत्रात म्हंटले आहे. India-China Face-Off in Ladakh: देशाच्या सीमारेषेचं उल्लंघन झाले नाही तर 20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची? पंतप्रधान मोदी यांच्या स्पष्टीकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल

ANI ट्विट

दरम्यान, नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी, गुरुवारी संविधान दुरुस्ती विधेयकास मंजुरी दिली. यानुसार नेपाळने आपला नवीन नकाशा अद्ययावत केला आहे. या नवीन नकाशात भारताच्या लिपुलेख (Lipulekh), कालापाणी (Kalapani) आणि लिम्पियाधुरा (Limpiyadhura) क्षेत्रांचा समावेश आहे. यावरून भारत आणि नेपाळ मध्ये सुद्धा तणाव असताना नेपाळ सरकारचे हे पत्र नक्की कशासाठी, हा विचार करण्याजोगा विषय आहे.