स्वातंत्र दिनाच्या दिवशी शस्रसंधीचे उल्लंघन, भारतीय जवानांकडून 3 पाकिस्तानी जवान ठार
इंडियन आर्मी (Photo Credits: IANS)

स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) दिवशी पाकिस्तानकडून (Pakistan) शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. याबद्दल एनआयने वृत्त दिले असून पाकिस्तानी जवानांकडून शस्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतीय जवानांनी याच सडेतोड उत्तर दिले. या गोळीबारात पाकिस्तानचे 3 जवान ठार झाले आहेत. पाकिस्तानने जम्मू-कश्मीरमधील पुंछ येथील केजी सेक्टरमध्ये आज गोळीबार केला. तसेच उरी आणि राजौरी येथे सुद्दा पाकिस्तानने शस्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

गुरुवारी कमांडर लेफ्टिनंट जनरल रणबीर सिंह यांनी असे सांगितले की, पाकिस्तानकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या भारतीय जवानांनी घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानकडून वापरण्यात आलेले सर्व प्रयत्न मोडीस काढले.

भारतीय जवानांच्या एका अधिकाऱ्यांनी असे सांगितले होते की, पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवर दहशतवाद्यांची संख्या वाढवत आहे. तसेच जम्मू-कश्मीर मध्ये या दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाकिस्तान अशाच मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याचे उत्तर भारतीय जवानांकडून दिले जाईल आणि याचा परिणाम खुप वाईट होईल अशी ताकिद देण्यात आली आहे.